ETV Bharat / bharat

Dharmarao Baba Atram : लोहखाणींवरून मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षल्यांची पुन्हा धमकी... - सुरजागड

Dharmarao Baba Atram : राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांना नक्षलवाद्यांकडून पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. वर्षभरात आत्राम यांना नक्षल्यांनी तिसऱ्यांदा धमकी दिली आहे.

Dharmarao Baba Atram
मंत्री धर्मरावबाबा आत्राम
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2023, 1:23 PM IST

माहिती देताना मंत्री धर्मरावबाबा आत्राम

गडचिरोली : Dharmarao Baba Atram: लोहखाणींवरून मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षल्यांची पुन्हा धमकी दिली आहे. नक्षल्यांनी पुन्हा एकदा गट्टा परिसरात पत्रक टाकले असून यात धर्मरावबाबा, त्यांचे जावई आणि काही लोकांना धमकी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Naxal Threat To MLA Dharmarao Baba Atram)

वर्षभरात आत्राम यांना तिसऱ्यांदा धमकी : मागील दोन वर्षांपासून सुरजागड येथे लोह खाणीत खनिजांचे उत्खनन सुरू आहे. याला नक्षल्यांचा विरोध आहे. यासाठी राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम जबाबदार असून त्यांना किंमत चुकवावी लागेल, अशा प्रकारची धमकी पत्रकातून देण्यात आली आहे. हे पत्रक पश्चिम सब झोनल ब्युरो श्रीनिवास याच्या नावे असून यात आत्राम यांचे जावई, त्यांचे भाऊ आणि कंपनीत कार्यरत काही लोकांची देखील नावे आहेत. वर्षभरात आत्राम यांना तिसऱ्यांदा नक्षल्यांनी धमकी दिली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांची सुरक्षेची ग्वाही : याआधी धर्मराव बाबा आत्राम ( Naxal Threat To Dharmarao Baba Atram ) यांना नक्षलवाद्यांकडून धमकीचे पत्र आले होते. सुरजागड ( Surjagad Project Gadchiroli ) येथील प्रकल्पावरून हे धमकीचे पत्र आले आल्याबाबतचा मुद्दा विधिमंडळात अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी यावर उत्तर देताना आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना सर्व योग्य सुरक्षा दिली जाईल, अशी ग्वाही दिली होती. यावेळी आपण गडचिरोलीचे पालकमंत्री असताना मलाही नक्षलवाद्यांच्या धमक्या आल्या होत्या. मात्र तेव्हा मला का सुरक्षा नाकारण्यात आली, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केला होता.

हेही वाचा -

  1. Dharmarao Baba Atram ON Minister Post: मी मंत्री होईल हे मला माहीत होतं - धर्मराव बाबा आत्राम
  2. हत्तीकॅम्प राज्य सरकारची मालमत्ता, केंद्र सरकारचा अधिकार काय?; आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचा सवाल
  3. Nagpur Winter Session धर्मराव बाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांच्या धमक्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.