ETV Bharat / bharat

फ्लाइटला उशीर झाल्यास प्रवाशांना 'व्हॉट्सअ‍ॅप'वर मिळणार अपडेट, इंडिगोतील घटनेनंतर DGCA ने जारी केली SOP - DGCA ने जारी केली SOP

DGCA SOP : इंडिगो फ्लाइटच्या उड्डाणाला उशीर झाल्यामुळे पायलटला मारहाण करण्यात आल्यानंतर DGCA ने सोमवारी एक SOP जारी केली. आता एअरलाइन्सना फ्लाइटच्या विलंबाबाबत अचूक रिअल-टाइम माहिती शेअर करावी लागेल. वाचा पूर्ण बातमी..

DGCA SOP
DGCA SOP
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2024, 9:37 PM IST

नवी दिल्ली DGCA SOP : DGCA नं प्रवाशांच्या सोयीसाठी एअरलाइन्ससाठी एक SOP जारी केली. इंडिगो फ्लाइटमध्ये पायलटला मारहाणीची घटना उघडकीस आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सूचनांमध्ये असं म्हटलं आहे की, सर्व विमान कंपन्यांना या एसओपीचं तात्काळ प्रभावानं पालन करावं लागेल. हा SOP DGCA संचालक अमित गुप्ता यांनी जारी केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून माहिती दिली जाईल : या अंतर्गत, विमान कंपन्यांना उड्डाणासाठी विलंब आणि प्रवाशांच्या गैरसोयी संदर्भात त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आलेत. यासोबतच विमानाला उशीर होण्याचं कारणही सांगणं गरजेचे आहे. यासाठी DGCA ने CAR जारी केला. तसेच प्रवाशांना आता व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून फ्लाइटच्या विलंबाची माहिती दिली जाईल.

एअरलाइन्सना फ्लाइटच्या विलंबाबाबत अचूक रिअल-टाइम माहिती शेअर करावी लागेल, जी प्रवाशांसोबत खालील माध्यमांद्वारे शेअर केली जाईल.

  • एअरलाइनची संबंधित वेबसाइट.
  • प्रवाशांना एसएमएस/व्हॉट्सअ‍ॅप आणि ईमेलद्वारे माहिती.
  • विमानतळांवर वाट पाहत असलेल्या प्रवाशांना फ्लाइटच्या विलंबाबाबत अद्ययावत माहिती.
  • विमानतळावरील एअरलाइन कर्मचार्‍यांनी योग्यरित्या संवाद साधणे आणि उड्डाण विलंबाबाबत गंभीरपणे प्रवाशांना योग्य कारणे सांगणे महत्त्वाचे आहे.

प्रतिकूल हवामानामुळे उड्डाणं रद्द करू शकतात : धुक्याचा हंगाम किंवा प्रतिकूल हवामान लक्षात घेऊन, विमान कंपन्या उड्डाणं अगोदरच रद्द करू शकतात, ज्यामुळे उशीर होण्याची शक्यता असते. याशिवाय, अशा परिस्थितीमुळे 3 तासांपेक्षा जास्त उशीर झाला तरी, गर्दी कमी करण्यासाठी विमान कंपन्या उड्डाणं रद्द करू शकतात. परंतु त्यासाठी आगाऊ कारवाई करणे आवश्यक आहे, जेणेकरून विमानतळ आणि प्रवाशांची गैरसोय कमी केली जाऊ शकते.

हे वाचलंत का :

  1. विमानाला उशिर झाल्यानं संतापला प्रवासी, थेट पायलटलाच केली मारहाण
  2. आता मुंबईहून अयोध्येला करा नॉन-स्टॉप प्रवास! स्पाईसजेट सुरू करणार डायरेक्ट फ्लाइट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.