हैदराबाद - आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी या नावाने ओळखले जाते. या वर्षी देवशयनी एकादशी 20 जुलाई 2021 रोजी आहे. हिंदू पंचांगानुसार एकादशी तिथीचा प्रारंभ 19 जुलै 2021 रोजी रात्री 09:59 वाजल्यापासून सुरू होऊन एकादशी तिथीची समाप्ती 20 जुलै 2021 रोजी 07:17 वाजता सांयकाळी होईल. नियमानुसार एकादशी व्रत 20 जुलै 2021 रोजी केले जाईल.
धार्मिक मान्यतानुसार या एकादशी पासून भगवान विष्णु आराम करतात व सृष्टीचे संचालन भगवान शिव करतात. एकादशी तिथी भगवान विष्णूला खूप प्रिय असते. शास्त्रांमध्ये देवशयनी एकादशीला मोठे महत्व आहे. भगवान विष्णू आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा सर्वश्रेष्ठ दिवस आहे.
सकाळी लवकर उठून नित्य कार्य आटोपून पूजा स्थानावर विष्णुचे षोडशोपचार पूजन करा. देवशयनी एकादशीदिवशी भगवान विष्णुच्या सहस्त्र नावांचा जप करणे फलदायक असते. या दिवशी मां लक्ष्मीची पूजेचेही विशेष महत्व असते. माता लक्ष्मीच्या मंत्रांचा जप, श्रीसूक्त पाठ, कनकधारा स्तोत्र पाठ सायंकाळी तुळशीजवळ बसून केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. .
विज्ञानानुसार या दरम्यान सूर्य व चंद्राचे तेज पृथ्वीवर कमी पोहोचते. पाण्याचे प्रमाण अधिक असते. वातावरणात अनेक जीव-जंतु उत्पन्न होतात, ज्यामुळे अनेक रोगांचा प्रसार होतो. यामुळे साधु-संत, तपस्वी या काळात एकाच ठिकाणी राहून तप, साधना, स्वाध्याय व प्रवचन करतात. या दिवशी केवळ ब्रजची यात्रा केली जाते. कारण या महिन्यात भूमंडळातील सर्व तीर्थ ब्रज मध्ये वास करत असतात.
ही आहे धार्मिक कथा -
धार्मिक कथेच्या अनुसार जेव्हा भगवान विष्णूने वामन अवतार घेऊन बली राजाकडून तीन पाऊल जमीन मागितली, तेव्हा दोन पावलांमध्ये पृथ्वी व स्वर्गाला श्री हरि पादांक्रांत केले. तेव्हा तिसरा पाय ठेवण्यासाठी बली राजाने आपले डोके पुढे केले. भगवान विष्णूने बली राजावर प्रसन्न होऊन त्यांना पाताळलोक दिला व त्यांचे दातृत्व पाहून त्यांना वर वर मांगण्यास सांगितले. बली ने म्हटले की, प्रभु तुम्ही सर्व देवी-देवतांबरोबर माझ्याबरोबर पाताललोकमध्ये वास्तव्य करा. आणि त्यानंतर विष्णू समस्त देवी-देवतांबरोबर पाताळलोकमध्ये गेले. तो दिवस एकादशी (देवशयनी) होती. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार एक अन्य प्रसंगात एक बार योगनिद्रेने कठिन तपस्या करून भगवान विष्णूला प्रसन्न केले व त्यांच्याकडे प्रार्थना केली की भगवान तुम्ही आपल्या शरीरात मला स्थान द्या. तेव्हा श्री हरिने पाहिले की त्यांचे शरीर तर लक्ष्मीद्वारे अधिष्ठित आहे. श्री विष्णुने अपल्या नेत्रांमध्ये योगनिद्रेला स्थान दिले व योगनिद्रेला आश्वासन दिले की, तु वर्षातील चार महिने माझ्या आश्रित राहशील.
देवशयनी एकादशी दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपाला तुपाचा दिवा लावा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जाप करत 11 परिक्रमा करा. या दिवशी भगवान विष्णूला पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा श्रृंगार करा. गरीबांमध्ये पिवळे धान्य वाटा. तीर्थस्थळ, पवित्र नद्यांच्या किनारी बसून गायत्री मंत्राचा जप करा. समस्त रोगांच्या निवारणासाठी या दिवशी एक नारळ व बदाम विष्णूला अर्पित करा.
देवशयनी एकादशीची पूजा-विधी
सकाळी लवकर उठून स्नान करा व घरातील मंदिरात दीप प्रज्वलित करा.
भगवान विष्णूला गंगा जलाने अभिषेक करा.
भगवान विष्णूला फुल व तुळसी पत्र अर्पित करा. जर शक्य असेल तर या दिवशी व्रत ठेवा.
भगवान विष्णूची आरती करा. भगवान विष्णू नैवैध दाखवा. भगवान विष्णूच्या भोगमध्ये तुळशीचा समावेश करा.
अशी द्या भगवान विष्णूला निद्रा -
सुप्ते त्वयि जगन्नाथ जमत्सुप्तं भवेदिदम्।
विबुद्दे त्वयि बुद्धं च जगत्सर्व चराचरम्।
अर्थात हे प्रभु तुम्हा जागण्याने संपूर्ण सृष्टि जागी होते आणि तुमच्या निद्रेने संपूर्ण सृष्टी व चराचर निद्रेत जातात. तुमच्या कृपेनेच ही सृष्टी जागी व झोपत असते. तुमच्या करूनेमुळेच विश्वाचा पसारा सांभाळला जात आहे.
भगवान विष्णूचे मंत्र (Bhagwan Vishnu Mantra)
ॐ विष्णवे नम:
ॐ अं वासुदेवाय नम:
ॐ आं संकर्षणाय नम:
ॐ अं प्रद्युम्नाय नम:
ॐ अ: अनिरुद्धाय नम:
ॐ नारायणाय नम: