नवी दिल्ली Dev Uthani Ekadashi 2023 : हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवउठनी एकादशीचं व्रत केलं जातं. देवउठनी एकादशीचं व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. गुरुवार, 23 नोव्हेंबर 2023 रोजी देवउठनी एकादशी व्रत पाळण्यात येणार आहे. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी देवउठनी एकादशीचं व्रत केलं जातं. देवउठनी एकादशीनंतर शुभ कार्याला सुरुवात होते.
देवउठनी एकादशीचं महत्त्व काय : अध्यात्मिक गुरू आणि ज्योतिषी शिवकुमार शर्मा यांच्या मते, आषाढ महिन्यात चातुर्मास सुरू होतो. अशा स्थितीत चातुर्मास सुरु होताच देवी-देवता विश्रांतीच्या स्थितीत जातात. याशिवाय ऋषी-मुनीही झोपडीत विसावतात. देवउठनी एकादशीच्या संदर्भात असं मानले जातं की या दिवशी देवी-देवता गतिमान आणि जागृत होतात तसंच विश्व व्यवस्थित चालतं. देवउठनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते.
देवउठनी एकादशी शुभ मुहूर्त :
- देवउठनी एकादशी 22 नोव्हेंबर (गुरुवार) रात्री 11:03 वाजता सुरू होईल.
- देवउठनी 23 नोव्हेंबर (शुक्रवार) रात्री 09:01 वाजता एकादशी संपेल.
- उपवास सोडण्याची वेळ: 24 नोव्हेंबर (शनिवार) सकाळी 06:51 ते 08:57 पर्यंत.
- देवउठनी एकादशीचं व्रत आणि उपासनेची वेळ: सकाळी 06:50 ते 08:09.
एकादशीच्या दिवशी या गोष्टींकडे विशेष द्या लक्ष :
- देवउठनी एकादशीच्या दिवशी तामसिक भोजन वर्ज्य आहे. दारू, गुटखा, सिगारेट इत्यादी कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ पूर्णपणे टाळावेत.
- ब्रह्मचर्य पाळावे. पौराणिक मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी शारीरिक संबंध निर्माण होऊ नयेत. या दिवशी असे करणे पाप मानले जाते.
- एकादशीला विशेष काळजी घ्या की, कोणत्याही व्यक्तीला चुकीचे शब्द वापरू नका. कोणावरही रागावू नका.
हेही वाचा :