फरीदकोट (पंजाब): Dera Follower Shot Dead: पंजाबमधील फरीदकोट जिल्ह्यात 2015 च्या अपमानास्पद घटनेतील Bargari blasphemy case आरोपी असलेल्या डेरा सच्चा सौदाच्या अनुयायाची गुरुवारी सकाळी काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या dera Follower pradeep singh shot dead केली, असे पोलिसांनी सांगितले. प्रदीप सिंग असे मृताचे नाव pradeep singh shot dead in Faridkot असून, त्याचे नाव बरगारी ईशनिंदा प्रकरणात होते. हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि त्यांनी गोळीबार केला.
प्रदीप सकाळी कोटकपुरा येथे दुकान उघडण्यासाठी जात असताना ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले, या घटनेत प्रदीप बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबार जखमी झाला. प्रदीप सिंगचा जागीच मृत्यू झाला तर प्रदीपचा सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रार याने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
फरीदकोटमध्ये 2015 मध्ये गुरु ग्रंथ साहिबच्या 'बीर' (प्रत) चोरीच्या प्रकरणात प्रदीप हा देखील आरोपींपैकी एक होता. त्याला अटक करण्यात आली असून सध्या तो जामिनावर आहे. 2015 मध्ये फरीदकोटमध्ये झालेल्या अपवित्र घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात निदर्शने झाली होती. त्या हिंसक घटनांमध्ये, बेहबल कलानमध्ये दोन जण ठार झाले होते, तर ऑक्टोबर 2015 मध्ये पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्यानंतर फरीदकोटमधील कोटकपुरा येथे काही लोक जखमी झाले होते.
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग हे डेराचे मुख्यालय असलेल्या सिरसा येथील आश्रमात दोन महिला शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. ऑगस्ट 2017 मध्ये पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते.