ETV Bharat / bharat

दिल्लीत ध्वनी प्रदूषण कायदा आणखी कठोर; १ लाखापर्यंत भरावा लागणार दंड - दिल्ली ध्वनी प्रदूषण नियंत्रण मंडळ

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणण्यासाठी नियमाचे उल्लंघन केल्यास ठोठावण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. नवीन नियमांप्रमाणे दंड आकारण्यात यावेत, अशी प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिल्ली सरकारला विनंती केली आहे.

दिल्ली ध्वनी प्रदूषण नियम
दिल्ली ध्वनी प्रदूषण नियम
author img

By

Published : Jul 10, 2021, 8:58 PM IST

नवी दिल्ली - प्रदुषणाच्या विळख्यात असलेल्या दिल्लीमध्ये ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. विना परवानगी लाऊस्पीकर अथवा डीजी सेट्स वापरणाऱ्या व्यक्तींना २५ हजारापर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहे. तर विनापरवानगी फटाके फोडणाऱ्यांना १ लाखापर्यंत दंड ठोठावम्यात येणार आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणण्यासाठी नियमाचे उल्लंघन केल्यास ठोठावण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. नवीन नियमांप्रमाणे दंड आकारण्यात यावेत, अशी प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिल्ली सरकारला विनंती केली आहे.

हेही वाचा-विम्बल्डनला मिळाली नवी विजेती; ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅश्ले बार्टीने इतिहास घडवला

असा ठोठावण्यात येणार दंड

  • विनापरवानगी विवाह समारंभात किंवा इतर ठिकाणी पहिल्यांदा फटाके फोडले आयोजक आणि जागेच्या मालकावर २० हजारांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
  • दुसऱ्यांदा नियमाचे उल्लंघन केल्यास आयोजक आणि जागेच्या मालकावर ४० हजारांचा दंड भरावा लागणार आहे.
  • तिसऱ्यांदा नियमाचे उल्लंघन केल्यास जागेचे मालक व आयोजकाला १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
  • जर सार्वजनिक किंवा धार्मिक कार्यक्रमात फटाके फोडले तर आयोजकाला १० हजारांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
  • सायलेन्स झोनमध्ये फटाके फोडले तर दुप्पट म्हणजे २० हजारांचा दंड ठोठोवण्यात येणार आहे.
  • जर वैयक्तीक किंवा व्यवसायिक जागेत फटाके फोडले तर १ हजार रुपयांचा दंड तर सायलेसन् झोनमध्ये ३ हजारांचा दंड संबंधितांना भरावा लागणार आहे.
  • बांधकामाच्या मशिन्समधून मर्यादेच्या तुलनेत ध्वनी प्रदूषण होत असल्यास ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
  • दिल्ली प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिल्लीतील सर्व प्रशासन, दिल्ली पोलीस व वाहतूक पोलिसांना ध्वनी प्रदुषणाच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा-UP population bill जाणून घ्या, उत्तर प्रदेशातील लोकसंख्या नियंत्रण कायद्याचा मसुदा

ध्वनी प्रदुषणाने पक्षी आणि प्राण्यांना जगणे कठीण होते. विविध संशोधनाअंती ध्वनी प्रदुषणाचे प्राणी व पक्ष्यांच्या मानसिक आणि वर्तनावर परिणाम होत असल्याचे दिसून आले. यामध्ये पक्षी व प्राण्यांच्या प्रजननसह तणावाच्या समस्यांचा समावेश आहे. हे संशोधन युरोपसह उत्तर अमेरिकेत करण्यात आले आहे.

आधुनिकीकरणाचा परिणाम?

आधुनिकीकरणाचा माणसाला फायदा होतोय. प्रत्येक व्यक्ती आनंदमय जीवनशैली अनुभवण्यासाठी धडपड करतोय. मोठ मोठे बंगले, आलीशान गाड्या हे उभारण्यासाठी वाट्टेल त्या थराला जातांना दिसून येत आहे. अशावेळी आधुनिकीकरणाच्या दुनियेत सुखात्मक स्वप्न रंगविण्यासाठी निसर्गाला आणि त्यातील घटकांना ध्वनी प्रदूषण मारक ठरत आहे.

ध्वनी प्रदुषणात वाढ व नामशेष पक्षी

अलीकडच्या काळात शहरातील ध्वनी प्रदुषणाचे प्रमाण झपाट्याने वाढल्याचे पहायला मिळत आहे. मोठ्या गाड्यांचा कर्णकर्कश आवाज शहरातील प्राणी व पक्षीसाठी घातक ठरला आहे. वाढत्या ध्वनी प्रदुषणामुळे नियमीत दिसणारे पक्षीच आज नामशेष होत असल्याचे चित्र आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.