ETV Bharat / bharat

Swati Maliwal Molested: दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्यासोबत छेडछाड.. कारने १५ मीटर ओढत नेले - LIETENANT SON MOLESTED SWATI MALIWAL

दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था किती ढासळली आहे याचे उदाहरण काल दिसून आले. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल या रात्री महिला सुरक्षेसंदर्भात तपासणी करत असताना एका मद्यधुंद कार चालकाने त्यांची छेडछाड करून त्यांचा हात कारच्या काचेत अडकवत १५ मीटर ओढत नेले आहे.

Swati Maliwal
स्वाती मालीवाल
author img

By

Published : Jan 19, 2023, 3:42 PM IST

नवी दिल्ली : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा विनयभंग करून दिल्ली एम्सजवळ कारमधून त्यांना १० ते १५ मीटरपर्यंत ओढून नेण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मालीवाल त्यांच्या टीमसोबत फूटपाथवर उभ्या असताना हा प्रकार झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. स्वाती मालीवाल या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. बुधवारी रात्री उशिरा एम्सजवळ एक घटना घडली. आरोपीने स्वाती यांचा विनयभंग केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

ट्विट करून दिली माहिती: रात्री उशिरा महिलांच्या सुरक्षेची तपासणी करत असताना ही घटना घडल्याचे मालीवाल यांनी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'काल रात्री मी दिल्लीतील महिला सुरक्षेच्या स्थितीची पाहणी करत होते. त्यावेळी एका ड्रायव्हरने मद्यधुंद अवस्थेत माझा विनयभंग केला आणि जेव्हा मी त्याला पकडले तेव्हा त्याने माझा हात गाडीच्या काचेत बंद करून मला ओढले. देवाने जीव वाचवला. दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षा सुरक्षित नसतील, तर परिस्थितीची कल्पना करा', असेही त्यात म्हटले आहे.

  • कल देर रात मैं दिल्ली में महिला सुरक्षा के हालात Inspect कर रही थी। एक गाड़ी वाले ने नशे की हालत में मुझसे छेड़छाड़ की और जब मैंने उसे पकड़ा तो गाड़ी के शीशे में मेरा हाथ बंद कर मुझे घसीटा। भगवान ने जान बचाई। यदि दिल्ली में महिला आयोग की अध्यक्ष सुरक्षित नहीं, तो हाल सोच लीजिए।

    — Swati Maliwal (@SwatiJaiHind) January 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कारमध्ये बसण्याची ऑफर: दिल्ली पोलिसांना आज पहाटे 3:11 वाजता पीसीआर कॉलद्वारे माहिती मिळाली की, बलेनो कारने एम्स बस स्टॉपच्या मागे एका स्वाती यांच्याकडे पाहून चुकीचे हावभाव केले, आणि तिला गाडीतून ओढले, असे दक्षिण दिल्ली जिल्हा पोलिस उपायुक्त चंदन चौधरी यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांची गरूंडा व्हॅन घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी स्वाती यांच्याशी घटनेसंदर्भात चर्चा केली.

कारमध्ये बसण्याची जबरदस्ती: चौधरी यांनी सांगितले की, पीडितेने सांगितले की, बलेनो कार चालवणारा व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत होता. माझ्या जवळ थांबला आणि वाईट हेतूने माझ्याकडे पाहिले. गाडीत बसायला सांगितले. तिने गाडीत बसण्यास नकार दिल्याने त्याने सर्व्हिस लेनमधून यू-टर्न घेत सर्व्हिस लँडवर येऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, महिलेचा हात गाडीच्या खिडकीत अडकला आणि 10 ते 15 मीटरपर्यंत त्याने तिला ओढत नेले.

आरोपी लेफ्टनंटचा मुलगा आहे: कोटला मुबारकपूर पोलिस स्टेशन आणि हौज खास पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी तात्काळ परिसरात नाकाबंदी केली. रात्रीच्या गस्ती पथकाने पहाटे 3:34 वाजता बलेनो कार चालकाला पकडले. सध्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. अटक केलेल्या कार चालकाचे नाव हरीश चंद्र (47) रा. लेफ्टनंट दुर्जन सिंग, रा. संगम विहार, दिल्ली असे आहे. आरोपी आणि पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

हेही वाचा: दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांना बलात्काराची धमकी स्वाती मालीवाल यांनी ट्विट करत दिली माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.