नवी दिल्ली : राजधानीतील शाहबाद डेअरी परिसरात अल्पवयीन तरुणीवर चाकूने वार करून तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी साहिल खान या आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी साहिलला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील त्याच्या मावशीच्या घरातून अटक केली. कोर्टात हजर केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला 7 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने केवळ 2 दिवसांची कोठडी मंजूर केली आहे.
-
Delhi teen murder: Accused Sahil sent to 2-day police custody
— ANI Digital (@ani_digital) May 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/3bcRjfIC5a#Sahil #DelhiPolice #Delhi #ShahbadDairy #RohiniCourt pic.twitter.com/F0RRL2jy6f
">Delhi teen murder: Accused Sahil sent to 2-day police custody
— ANI Digital (@ani_digital) May 30, 2023
Read @ANI Story | https://t.co/3bcRjfIC5a#Sahil #DelhiPolice #Delhi #ShahbadDairy #RohiniCourt pic.twitter.com/F0RRL2jy6fDelhi teen murder: Accused Sahil sent to 2-day police custody
— ANI Digital (@ani_digital) May 30, 2023
Read @ANI Story | https://t.co/3bcRjfIC5a#Sahil #DelhiPolice #Delhi #ShahbadDairy #RohiniCourt pic.twitter.com/F0RRL2jy6f
तपास करण्यासाठी कोठडी आवश्यक : आरोप साहिलने हत्येत वापरलेला चाकू जप्त करण्यासाठी त्याला रिमांडवर घेणे आवश्यक होते. यासोबतच साहिलने कोणत्याही नियोजनाशिवाय अल्पवयीन मुलीची हत्या केली की सुनियोजित कट होता, याचाही तपास पोलीस करणार आहेत. विशेष म्हणजे रविवारी रात्री साहिलने 16 वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून हत्या केली होती. यादरम्यान आरोपीने तरुणीवर चाकूने अनेक वार केले होते.
तरुणीने बोलणे बंद केल्याने केला खून : नराधम साहिलसोबत मुलीने बोलणे बंद केल्यामुळेच त्याने तिची हत्या केल्याचे सांगण्यात आले. तो ३ वर्षापासून या तरुणीसोबत बोलत होता. मात्र मुलीने त्याच्याशी बोलणे बंद केल्याने त्याने तिची हत्या केली. गुन्हा केल्यानंतर साहिलने मोबाईल घरीच ठेवला होता. त्यानंतर बुलंदशहर येथे मावशीच्या घरी गेला. तो बसने बुलंदशहरला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला अटक केली.
घटना सीसीटीव्ही कैद : देशाच्या राजधानीत सोमवारी अल्पवयीन तरुणीचा खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. नराधम साहिलने तरुणीवर 21 वेळा चाकून वार करुन तिचा निर्घृण खून केला. चाकूचे वार करुनही या नराधमाने तरुणीच्या डोक्यात दगडाने वार केले. त्यामुळे तरुणीचा जागीच मृत्यू झाला. खुनाची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
हेही वाचा -
-
- Brutal Murder in Delhi : दिल्लीत तरुणीचा निर्घृण खून, नराधम उत्तर प्रदेशातील बुलंदशरहमधून जेरबंद
- Mathura POCSO death sentence : कोर्टाची फास्ट कारवाई, १५ दिवसात अनैसर्गिक बलात्कारी दोषीला दिली फाशीची शिक्षा
- FIR On Wrestlers : जंतरमंतरवर आखाडा; ब्रिजभूषण सिंह विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर गुन्हा, आंदोलकांचे तंबूही उखडले