मुंबई : खराब हवामानामुळे गुरुवारी दिल्ली-शिर्डी स्पाइस जेट विमान एसजी953 च्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा ( delhi shirdi spice jet flight stuck ) लागला. सुमारे पाच तास प्रवासी विमानात अडकले होते. विमान शिर्डीला पोहोचल्यानंतरही ते विमानतळावर उतरू शकले ( spice jet flight stuck due to bad weather ) नाही. कधी खराब हवामान तर कधी तांत्रिक कारणे दिली गेली. दिल्लीहून उड्डाण केल्यानंतर दुपारी साडेचार वाजता हे विमान शिर्डी विमानतळावर उतरणार होते. मात्र ते वेळेवर पोहोचले नाही.
विमान शिर्डीऐवजी मुंबईकडे वळवण्यात ( delhi shirdi flight landed in mumbai ) आले. शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. खराब हवामानामुळे मार्ग बदलावा लागला. प्रवासी आणि विमानाच्या सुरक्षेचा विचार करून हे करण्यात आल्याचे स्पाईसजेटकडून स्पष्ट करण्यात आले.
-
SpiceJet flight SG 953 operating from Delhi to Shirdi was diverted to Mumbai due to bad weather. The passengers are being offered surface transport to Shirdi from Mumbai. Safety of passengers, crew and aircraft is paramount at SpiceJet: SpiceJet Spokesperson pic.twitter.com/nztUhyl9oe
— ANI (@ANI) May 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">SpiceJet flight SG 953 operating from Delhi to Shirdi was diverted to Mumbai due to bad weather. The passengers are being offered surface transport to Shirdi from Mumbai. Safety of passengers, crew and aircraft is paramount at SpiceJet: SpiceJet Spokesperson pic.twitter.com/nztUhyl9oe
— ANI (@ANI) May 19, 2022SpiceJet flight SG 953 operating from Delhi to Shirdi was diverted to Mumbai due to bad weather. The passengers are being offered surface transport to Shirdi from Mumbai. Safety of passengers, crew and aircraft is paramount at SpiceJet: SpiceJet Spokesperson pic.twitter.com/nztUhyl9oe
— ANI (@ANI) May 19, 2022
आधी शिर्डीत विमान उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र पायलटने ते धोकादायक असल्याचे समजून उतरवले नाही, असे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत विमान मुंबईच्या दिशेने वळवण्यात आले. यानंतर विमान मुंबईला नेण्यात आले आणि सुरक्षितपणे उतरवण्यात आले. त्यामुळे मुंबईहून शिर्डीला येताना प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, सुरक्षित लँडिंग झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा वाटला.
हेही वाचा : Storm In Bihar : बिहारमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, 27 जणांचा मृत्यू