नवी दिल्ली - देशात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णांचे बळी जात आहेत. ही संख्या एवढी आहे, की स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाही शिल्लक राहत नाही. यातच ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. या संकटात सामान्य नागरिकांना मदत करण्यासाठी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. स्व:ताला पूर्ण झोकून दिले आहे. देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, याच मदतीमुळे आता दिल्ली पोलिसांनी श्रीनिवास बी. व्ही. यांची 20 मिनिटे चौकशी केली आहे. यावरून काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी टि्वट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
-
बचाने वाला हमेशा मारने वाले से बड़ा होता है।#IStandWithIYC
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 14, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">बचाने वाला हमेशा मारने वाले से बड़ा होता है।#IStandWithIYC
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 14, 2021बचाने वाला हमेशा मारने वाले से बड़ा होता है।#IStandWithIYC
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 14, 2021
'वाचवणारा हा नेहमी मारणाऱ्यापेक्षा मोठा असतो', असे टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे. तसेच त्यांनी #IStandWithIYC हा हॅशटॅगही टि्वट केला आहे. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी देखील या चौकशीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. चौकशीमुळे घाबरून न जाता न डगमगता मदतीचं काम सुरुच ठेवणार असल्याचे ते म्हणाले. अशा भयानक सूड कृत्याने आम्ही घाबरणार नाही किंवा जज्बा मोडणार नाही. नागरिकांची सेवा सुरूच राहिल, असेही सुरजेवाला म्हणाले. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने श्रीनिवास यांची चौकशी केली असून ही चौकशी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाल्याचं सांगितलं जात आहे.
आम्ही काहीही चूकीचे केलेले नाही. जर आमचा छोटासा प्रयत्न काहीजणांचे आयुष्य वाचविण्यास मदत करत असेल तर आम्ही अशा गोष्टींना घाबरून जाणार नाही. आम्ही काम थांबवणार नाही आणि भीती बाळगणार नाही, अशी प्रतिक्रिया श्रीनिवास यांनी दिली आहे.
कोण आहेत श्रीनिवास बी. व्ही.?
श्रीनिवास बी. व्ही हे कर्नाटकाच्या शिमोगा जिल्ह्याच्या भद्रावती येथील आहेत. कर्नाटकच्या अंडर-१६ टीममध्ये ते होते. मात्र, क्रिकेटमध्ये यश मिळाले नसल्याने त्यांनी राजकारणाची वाट धरली. आपल्या कार्यातून ते भारतीय युवा काँग्रेसचे एक सक्षम चेहरा बनले आहेत. २०२० मध्ये राहुल गांधींनी त्यांना युवा काँग्रेस अध्यक्ष बनवले. त्यांच्या नेतृत्त्वात युवा काँग्रेसने केंद्र सरकारच्या अनेक निर्णयांविरोधात आंदोलन केले आहेत. कोरोनाचा प्रसार झाल्यापासून रुग्णांना इंजेक्शन आणि औषधांसारख्या आवश्यक गोष्टींचा पुरवठा ते करत आहेत. यासाठी त्यांनी राज्यांमध्ये SOSIYC ची पथकं तयार केली असून हे पथके गरजूंना मदत करतात. ज्यांना मदत हवी असेल ते #SOSIYC कडे मदत मागतात. श्रीनिवास बी. व्ही यांचे कार्य पाहून सोनू सूदनेही त्यांचे कौतुक केले होते.
लिपाईन्स आणि न्यूझीलंड दुतावासाने थेट श्रीनिवास टीमकडे मदत मागितली त्यावेळी सर्व देशाचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. एका अभ्यासानुसार, श्रीनिवास यांना १ मार्च ते २४ एप्रिलपर्यंत मदतीसाठी 88,321 वेळा टॅग करण्यात आलंय. कोरोना संकट संपूर्ण मानवजातीवर घोंघावत असताना आपल्याला अशाच राजकीय नेत्यांची गरज असल्याची लोकांची भावना आहे.
काँग्रेस आणि परराष्ट्र मंत्रालयाचा वाद -
विशेष म्हणजे, अलीकडेच परदेशी दूतावासांनी काँग्रेसकडे ऑक्सिजनसाठी मदत मागितली होती. न्यूझीलंड आणि फिलिपिन्स या दोन परदेशी दूतावासांमधील गंभीर रुग्णांना काँग्रेसने ऑक्सिजनचा पुरवठा केला होता. मदतीनंतर श्रीनिवास बी. व्ही यांनी न्यूझीलंड दुतवासाचे मदतीच्या आवाहनाचे टि्वटवर व्हिडीओ टि्वट करत मदत करण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक ट्वीट केले. त्यांनी युवा काँग्रेसचे कौतूक केले आणि परराष्ट्र मंत्रालय झोपलं आहे का, असा सवाल त्यांनी केला. यानंतर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांच्यात खडाजंगी झाली. ट्विटरवर वाद-विवाद सुरू होताच न्यूझीलंड दूतावासाने आपले मदतीच्या आवाहनाचे ट्विट डिलिट केले. 'आम्ही ऑक्सिजन सिलिंडरसाठी सर्वांकडे मदत मागत आहे. आमच्याकडून झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो,' अशा आशयाचे ट्विट केले होते.
हेही वाचा - गुजरात : ६ दिवस व्हेटिंलेटरवर राहून झुंज; ४ महिन्यांच्या बालकाची कोरोनावर मात