ETV Bharat / bharat

Rahul Gandhi Remarks : दिल्ली पोलिसांच्या नोटिसीला राहुल गांधींनी दिले उत्तर; म्हणाले, जर सत्ताधारी पक्षाने... - Rahul Gandhi on women

श्रीनगरमधील भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींचे एक विधान समोर आले होते, ज्यामध्ये ते महिलांसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगत होते. एका नोटीसद्वारे दिल्ली पोलिसांनी त्यांना त्या सर्व महिलांची माहिती देण्यास सांगितले आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिस आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. याप्रकरणावरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. दिल्ली पोलिसांच्या नोटीसला राहुल गांधी यांनी उत्तर दिले आहे. तसेच दिल्ली पोलिसांना काही प्रश्नही विचारले आहेत.

Rahul Gandhi
राहुल गांधी
author img

By

Published : Mar 19, 2023, 12:05 PM IST

Updated : Mar 19, 2023, 6:12 PM IST

राहुल गांधीच्या घरी पोहचले पोलिस

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांचे स्पेशल सीपी सागर प्रीत हुडा आज सकाळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले होते. दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना नोटीस देऊन त्यांच्याकडून माहिती मागवली होती. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रे दरम्यान महिलांच्या लैंगिक छळाबद्दल विधान केले होते. त्या प्रकरणी पोलिसांनी त्यांना एक प्रश्नावली पाठवली होती, जिची माहिती घेण्यासाठी विशेष सीपी राहुल गांधी यांच्या 12, तुघलक लेन येथील निवासस्थानी पोहोचले होते. मात्र, पोलिसांनी राहुल गांधी यांचे म्हणणे नोंदवून घेतले नाही. पोलिसांनी त्यांना दुसरी नोटीस दिली आणि घरातून परतले.

  • Rahul Gandhi in his preliminary reply to Delhi Police also stated that he hoped that this police action had nothing to do with the stand he took in Parliament and outside on various issues including the Adani case: Sources

    — ANI (@ANI) March 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राहुल गांधी यांचे नोटिसीला उत्तर - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून प्राथमिक उत्तर प्राप्त झाले आहे. परंतु तपास पुढे नेणारी कोणतीही माहिती त्यांच्याकडून मिळालेली नाही, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. तत्पूर्वी आज दिल्ली पोलिसांच्या एका पथकाने भारत जोडो यात्रेदरम्यान उल्लेख केलेल्या लैगिंक छळ पीडितांची माहिती घेण्यासाठी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. पुढील 8-10 दिवसांत सविस्तर उत्तर देऊ, असे सांगत राहुल गांधी यांनी दिल्ली पोलिसांना प्राथमिक उत्तर सादर केले आहे. या उत्तरात राहुल गांधी म्हणाले की, जर सत्ताधारी पक्षाने अशा प्रकारची यात्रा काढली असती तर त्यांनाही अशाचप्रकारचे प्रश्न तुम्ही विचारले असते का?

16 मार्चला नोटीस पाठवली होती : श्रीनगरमधील भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी दिलेले एक विधान दिले होते, ज्यामध्ये ते महिलांसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगत होते. भारत जोडो यात्रेदरम्यान मला बलात्कार आणि शोषण झालेल्या अनेक महिला आढळल्या, असे ते म्हणाले होते. दिल्ली पोलिसांनी त्यांना 16 मार्चला एक नोटीस पाठवली होती. या नोटीसद्वारे पोलिसांनी राहुल गांधींना त्या सर्व महिलांची माहिती देण्यास सांगितले आहे, जेणेकरून ते या प्रकरणी कारवाई करू शकतील.

  • #WATCH | We've come here to talk to him. Rahul Gandhi gave a statement in Srinagar on Jan 30 that during Yatra he met several women & they told him that they had been raped...We're trying to get details from him so that justice can be given to victims: Special CP (L&O) SP Hooda pic.twitter.com/XDHru2VUMJ

भारत जोडो यात्रेदरम्यान विधान : स्पेशल सीपी सागर प्रीत हुड्डा म्हणाले की, आम्ही राहुल गांधींशी बोलण्यासाठी आलो आहोत. 30 जानेवारी रोजी राहुल गांधींनी श्रीनगरमध्ये विधान केले होते की, भारत जोडो यात्रेदरम्यान ते अनेक महिलांना भेटले होते ज्यांनी त्यांना त्यांच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले होते. पीडितांना न्याय मिळावा यासाठी आम्ही त्यांच्याकडून तपशील मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले.

राहुल गांधींनी भेटण्यास वेळ दिला नाही : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नोटीसमध्ये राहुल गांधींना त्या महिलांची माहिती देण्यास सांगितले आहे. नोटीसमध्ये पोलिसांनी राहुल गांधींना विचारले आहे की, त्यांना महिलांनी हे कधी आणि कुठे सांगितले? ते स्त्रियांना आधीच ओळखत होते का? तुम्हाला त्या महिलांबद्दल माहिती आहे का? तुम्ही सोशल मीडियावर जे बोलता त्याची तुम्ही पुष्टी करता का? मिळालेल्या माहितीनुसार, नोटीस दिल्यानंतर बुधवारी दिल्ली पोलिसांचे एक वरिष्ठ अधिकारी राहुल गांधींना भेटायला गेले होते. मात्र तीन तास प्रतीक्षा करूनही राहुल गांधी त्यांना भेटले नाहीत. त्यानंतर त्यांनी गुरुवारी पुन्हा त्यांच्याशी बोलण्यासाठी वेळ मागितला, मात्र राहुल गांधी यांनी आपल्याकडे वेळ नसल्याचे सांगितले. पोलिसांनी राहुल गांधी यांना नोटीसला लवकरात लवकर उत्तर देण्यास सांगितले होते, जेणेकरून पोलिसांना या प्रकरणाचा तपास पुढे चालू ठेवता येईल.

काँग्रेसची प्रतिक्रिया - वरून आदेश मिळाल्यानंतरच दिल्ली पोलीस राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहोचले, असा आरोप काँग्रेसने भाजपवर केला आहे. भारत जोडो यात्रेशी संबंधित माहिती पोलीस प्रथमच घेत असल्याचे पक्षाने म्हटले आहे. याबाबतही लवकरच खुलासा करणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे. या प्रकरणाला कायदेशीर उत्तर देऊ, असे काँग्रेसने म्हटले आहे.

  • 16 मार्च को राहुल गांधी जी को एक नोटिस भेजा गया।

    जिसमें दिल्ली पुलिस ने उनसे 'भारत जोड़ो यात्रा' में मिली पीड़ित महिलाओं की जानकारी मांगी थी।

    आज पुलिस नए नोटिस के साथ फिर यही सवाल पूछने आ गई।

    यह उत्पीड़न, प्रतिशोध और धमकी की राजनीति का नया आयाम बनाया गया है।

    : @DrAMSinghvi जी pic.twitter.com/0fH1cQZ4x7

    — Congress (@INCIndia) March 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय आहे प्रकरण? - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी श्रीनगरमध्ये बोलताना महिलांबाबत एक वक्तव्य केले होते. भारत जोडो यात्रेदरम्यान अनेक महिला मला भेटत होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे मला सांगितले होते, असे राहुल गांधी यांनी त्यावेळी म्हटले होते. याच प्रकरणी त्या महिलांची माहिती जाणून घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती. आता या प्रकरणावरून राजकारण तापले आहे.

हेही वाचा : Subramanian Swamy Petition : सुब्रमण्यम स्वामी यांची उच्च न्यायालयात याचिका, येस बँकेच्या मालमत्ता हस्तांतरणाच्या चौकशीची मागणी

Last Updated : Mar 19, 2023, 6:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.