ETV Bharat / bharat

ट्रॅक्टर परेड हिंसाचार : दिप सिद्धूची माहिती देणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस - दिल्ली ट्रॅक्टर परेड हिंसाचार

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आता आरोपींना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले आहे. दीप सिद्धू आणि इतर आणखी तिघांना पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

दिप सिद्धू
दिप सिद्धू
author img

By

Published : Feb 3, 2021, 2:04 PM IST

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आता आरोपींना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले आहे. पंजाबी अभिनेता दीप सिद्धू आणि इतर तीन जणांना पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. सोबतच हिंसाचारात सहभागी असलेल्या इतर काही आरोपींवर ५० हजारांचे बक्षीस ठेवले आहे. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

१२ संशयितांची छायाचित्रे जाहीर -

प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी दिल्लीत ट्रॅक्टर परेडचे आयोजन केले होते. मात्र, या रॅलीत हिंसाचार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आता हिंसाचारात सहभागी असणाऱ्या १२ संशयित आरोपींची छायाचित्रे जाहीर केली आहेत. संशयितांची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून १०० जणांना चौकशीची नोटीस धाडण्यात आली आहे.

ट्रॅक्टर परेड हिंसाचार

४४ एफआयआर दाखल

दिल्ली पोलिसांनी आंदोलनातील हिंसाचाराप्रकरणी आत्तापर्यंत ४४ एफआयआर दाखल केल्या असून १२२ जणांना अटक केली आहे. तर ९ प्रकरणांची चौकशी गुन्हे शाखेकडून सुरू आहे. आंदोलकांनी लाल किल्ल्यावरही कब्जा मिळवला होता. तसेच धार्मिक ध्वज फडकावला होता. दिल्लीतील अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांत झटापटी झाल्या. यात पोलीस आणि आंदोलक जखमी झाले.

लाल किल्ल्यावर आंदोलकांचा कब्जा -

ट्रॅक्टर र‌ॅलीला अचानक हिंसक वळण लागले होते. काही शेतकरी मोर्चाचा नियोजित मार्ग सोडून लाल किल्ल्याच्या दिशेने गेले होते. यात दिप सिद्धूचाही सहभाग होता. पाहता पाहता आंदोलकांनी लाल किल्ल्यावर कब्जा केला. तसेच निशाण ए साहीब हा शिखांचा धार्मिक ध्वज फडकावला. दीप सिद्धूने भडकावल्यामुळे आंदोलक लाल किल्ल्याकडे गेले असा आरोप त्यावर होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.