ETV Bharat / bharat

Delhi Patna Flight Diverted : दिल्लीहून पाटण्याला जाणारे स्पाइसजेट वाराणसी विमानतळावर वळवण्यात आले, प्रवाशांनी घातला गोंधळ - व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

दिल्लीहून पाटण्याला जाणारे विमान वाराणसीला वळवण्यात आले. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी विमानात गोंधळ घातला. काही प्रवाशांनी त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.

Spicejet
स्पाइसजेट
author img

By

Published : May 26, 2023, 1:55 PM IST

दिल्लीहून पाटण्याला जाणारे विमान वाराणसीला वळवण्यात आल्यामुळे संतप्त प्रवाशांनी विमानात गोंधळ घातला.

वाराणसी : दिल्लीहून पाटण्याला जाणारे स्पाइसजेटचे विमान गुरुवारी रात्री वाराणसी विमानतळावर वळवण्यात आल्यामुळे विमानातील प्रवाशांनी गोंधळ घातला. त्याचा व्हिडिओ काही प्रवाशांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. यानंतर स्पाइसजेटच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी आपले निवेदन जारी केले की, काही कारणास्तव पाटणा विमानतळ रात्री बंद करण्यात आले. त्यामुळे दिल्लीहून पाटण्याला जाणारे विमान वळवून वाराणसीतच थांबवावे लागले. त्यामुळे लोक अडचणीत आले होते. लोकांना सहज पाटणा किंवा दिल्लीला परत पाठवले गेले.

पाटणा विमानतळावर सुधारणेचे काम सुरू होते : मिळालेल्या माहितीनुसार, स्पाइसजेटच्या फ्लाइट क्रमांक sg471 ने 149 प्रवाशांसह नवी दिल्ली विमानतळावरून पाटण्याला उड्डाण केले होते. यासंदर्भात स्पाइसजेटचे व्यवस्थापक राजेश कुमार सिंह सांगतात की, पाटणा विमानतळावर सुधारणेचे काम सुरू होते. त्यामुळे विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यानंतर विमान वळवण्यात आले आणि रात्री वाराणसी विमानतळावर उतरवण्यात आले. यादरम्यान फ्लाइटमध्ये बसलेले प्रवासी विमानाने पाटण्याला जाण्यासाठी रात्री उशिरापर्यंत वाट पाहत राहिले, मात्र त्यांना विमानाने पाटण्याला जाणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. मात्र रात्री 134 प्रवाशांना विमान कंपनीने त्यांच्या इच्छित स्थळी पाठवले.

  • @JM_Scindia @Officejmscindia
    Now Varanasi wont permit deboarding. Pilot says flight to return to Delhi. Its 10.42pm beyond bed time for many seniors and small kids on the flight.
    People hv been not given any customer courtsey..

    — Deepali (@dsjfam_deepali) May 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रवाशांना रस्त्याने पाटण्याला पाठवण्यात आले : 15 हून अधिक लोकांना दिल्लीला परत पाठवण्यात आले. त्यांच्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. ज्यांना पाटण्याला जायचे होते त्यांना बसची व्यवस्था करून रस्त्याने पाटण्याला पाठवण्यात आले. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र काही लोकांनी फ्लाइटच्या आत एक व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : यासंदर्भात स्पाइसजेटचे व्यवस्थापक राजेश कुमार सिंह सांगतात की, पाटणा विमानतळाच्या धावपट्टीवर काही काम सुरू होते. त्यामुळे दिल्लीहून पाटण्याला जाणारे विमान बनारसमध्येच थांबवण्यात आले. प्रवाशांना कोणतीही अडचण न होता पाटणा आणि दिल्लीला परत पाठवण्यात आले. काही प्रवाशांना अडचण आली म्हणून त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. मात्र कोणालाही कोणत्याही समस्येचा सामना करावा लागला नाही.

हेही वाचा : 1. President On Tribal Women : आदिवासी महिला असल्याचा अभिमान आहे - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

2. Osho Property Dispute: ओशोंच्या मालमत्ता वाद प्रकरणात पुणे धर्मादाय कार्यालयावर मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे

3. New Parliament Inauguration : राष्ट्रपतींच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन व्हावे; सर्वोच्च न्यायालयात याचिका, आज होणार सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.