ETV Bharat / bharat

साडेतीनशे रुपयासाठी तरुणाला 50 वेळा चाकुनं भोसकलं; हत्येनंतर अल्पवयीन क्रूरकर्मा मृतदेहापुढं नाचला

Delhi Murder Case : ईशान्य दिल्लीत अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त मुलानं तरुणाला तब्बल 50 वेळा चाकुनं भोसकून खून केला. या घटनेनं दिल्ली हादरुन गेली आहे. या मारेकऱ्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तब्बल 50 वेळा चाकुनं भोसकल्यानंतरही क्रूरकर्मा मारेकऱ्यानं तरुणाचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मृतदेहासमोर नाचल्याचंही घटनास्थळावरील सीसीटीव्हीतून स्पष्ट झालं.

Delhi Murder Case
घटनास्थळावरील सीसीटीव्ही
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2023, 1:36 PM IST

नवी दिल्ली Delhi Murder Case : केवळ साडेतीनशे रुपयासाठी एका 16 वर्षीय विधीसंघर्षग्रस्त मुलानं तरुणाला तब्बल 50 वेळा भोसकलं. ही धक्कादायक घटना दिल्लीतील ईशान्य परिसरात मंगळवारी रात्री घडली. या मुलानं तरुणाच्या शरीरावर तब्बल 50 वेळा भोसकून त्याचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. तरुणाच्या डोक्याला लाथ मारत त्याला गल्लीत ओढून त्याच्या मृतदेहापुढं मारेकरी बालक बीभत्स नाचल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलं आहे.

मंगळवारी रात्री 11.15 च्या सुमारास स्वागत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनता मजदूर कॉलनी गली क्रमांक 18 ईदगाह रोड इथं एका मुलाची चाकूनं हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. यावेळी पोलिसांनी रक्तबंबाळ मुलाला रुग्णालयात नेलं असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. - डॉ जावई तिर्की, पोलीस उपायुक्त

तरुणाला तब्बल 50 वेळा भोसकलं : ईशान्य दिल्लीतील परिसरात मंगळवारी रात्री 10.20 च्या सुमारास 16 वर्षीय विधीसंघर्षग्रस्त मुलानं तरुणाला लुटीच्या उद्देशानं अडवलं होतं. दारूच्या नशेत असलेल्या या बालकानं तरुणावर चाकुचे वार केले. यावेळी मुलानं तब्बल 50 वार तरुणावर केले. त्यामुळे पोलीसही हादरुन गेले आहेत. तरुणावर वार करुन हा मुलगा थांबला नाही, तर त्यानं डोक्यात लाथ मारुन मृतदेह अरुंद गल्लीत ओढल्याचंही पोलिसांनी यावेळी सांगितलं.

मृतदेहापुढं केल बिभत्स नृत्य : मुलानं तरुणावर चाकुचे वार केल्यानंतर तो तरुण खाली कोसळला. मात्र यावेळी मारेकरी मुलानं त्याच्या जवळचे पैसे काढून घेतले. त्यानंतर त्या तरुणाला अरुंद गल्लीत ओढून त्याच्या डोक्यावर लाथ मारली. इतकंच नाही, तर त्याच्या मृतदेहापुढं मारेकऱ्यानं बीभत्स नाचल्याचंही सीसीटीव्हीतून स्पष्ट झाल्याची माहिती ईशान्य दिल्लीचे पोलीस उपायुक्त डॉ. जावई तिर्की यांनी दिली.

हल्ल्याच्या वेळी मारेकरी दारूच्या नशेत : शवविच्छेदन अहवालात तरुणाच्या मानेवर, कानांवर आणि चेहऱ्यावर चाकूनं वार केल्याच्या खुणा आहेत. मृत तरुणाच्या शरीरावर चाकूनं वार केलेल्या 50 खुणा आढळून आल्या आहेत. बुधवारी सकाळी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ल्याच्या वेळी मारेकरी दारूच्या नशेत होता, असं पोलिसांनी सांगितलं. मारेकरी जाफ्राबाद इथला रहिवासी असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. Delhi Crime : जीममध्ये ओळख झालेल्या महिलेचा गोळ्या झाडून खून, माथेफिरुने संपविले स्वत:चेही जीवन!
  2. Shraddha Walkar Murder Case : धक्कादायक! प्रेयसीच्या शरीराचे केले ३५ तुकडे, आरोपीला अटक
  3. Delhi Murder Case : दिल्लीतील तरुणीच्या खून प्रकरणात आता लागणार पोक्सो, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग पाठवणार नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.