ETV Bharat / bharat

Delhi MCD Mayor Election : दिल्लीला आज तरी महापौर मिळणार का? चौथ्यांदा होणार बैठक - दिल्ली महापौर निवडणुकीसाठी बैठक

दिल्ली एमसीडी महापौर निवडणुकीसाठी बुधवारी पुन्हा एकदा बैठक बोलावण्यात आली आहे. या आधी तीन निवडणूक सभांमध्ये गदारोळ झाला होता. अशा स्थितीत आज दिल्लीला महापौर मिळतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Delhi MCD
दिल्ली एमसीडी
author img

By

Published : Feb 22, 2023, 10:20 AM IST

नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आज चौथ्यांदा बैठक होणार आहे. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत तीन बैठका बोलाविण्यात आल्या, मात्र प्रत्येक वेळी गदारोळामुळे महापौरांची निवड होऊ शकली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि दिल्ली सरकारच्या प्रस्तावावर नायब राज्यपालांच्या मंजुरीनंतर बुधवारी सकाळी 11 वाजता दिल्ली महानगरपालिकेची बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सदस्यांची निवडणूक होणार आहे.

निवडणुकाची निकाल काय? : दिल्ली महानगरपालिकेच्या एकत्रिकरणानंतर, महानगरपालिकेची निवडणूक 4 डिसेंबर रोजी झाली आणि त्याचे निकाल 7 डिसेंबर रोजी आले. निवडणुकीत आम आदमी पक्षाने 134 जागा जिंकून बहुमत मिळवले. त्याचवेळी 15 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपच्या खात्यात 104 जागा आल्या. या शिवाय काँग्रेसला केवळ 9 जागांवर समाधान मानावे लागले, तर अपक्ष उमेदवारांनी 3 जागांवर विजय मिळवला.

6 जानेवारीला पहिली बैठक : यानंतर एमसीडीची पहिली बैठक 6 जानेवारीला बोलावण्यात आली होती. या बैठकीत महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या 6 सदस्यांच्या निवडीसोबतच नामनिर्देशित आणि निवडून आलेल्या सदस्यांच्या शपथविधीही होणार होत्या. बैठक सुरू असताना उपराज्यपालांनी नियुक्त केलेल्या पीठासीन अधिकारी सत्य शर्मा यांनी प्रथम नामनिर्देशित नगरसेवकांना शपथविधीसाठी बोलावले, त्यावरून आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला आणि सभेत गदारोळ सुरू झाला. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली आणि एकमेकांवर हाणामारीचे आरोपही झाले. यानंतर पीठासीन अधिकारी सत्य शर्मा यांनी महापालिकेचे कामकाज तहकूब केले.

24 जानेवारीला दुसरी बैठक : 24 जानेवारीला पुन्हा एकदा महामंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये पीठासीन अधिकाऱ्यांनी प्रथम नामनिर्देशित नगरसेवकांना शपथविधीसाठी बोलावले, मात्र आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी त्याला विरोध केला. या सर्वांसह शपथविधी प्रक्रिया पूर्ण होऊन सर्व नामनिर्देशित व निवडून आलेल्या नगरसेवकांनी शपथ घेतली, मात्र गदारोळामुळे ही सभाही पीठासीन अधिकारी महापौर निवडण्यापूर्वीच तहकूब करावी लागली.

6 फेब्रुवारीला तिसरी बैठक : त्यानंतर 6 फेब्रुवारी रोजी महापौरपदाच्या निवडणुकीसाठी बैठक बोलावण्यात आली होती, ज्यामध्ये पीठासीन अधिकारी सत्य शर्मा यांनी नामनिर्देशित नगरसेवकांना महापौरपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार दिला होता. याला आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध केल्याने सभा पुन्हा एकदा तहकूब करण्यात आली. यावर आपच्या महापौरपदाच्या उमेदवार शेली ओबेरॉय यांनी लवकर महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आणि नामनिर्देशित नगरसेवकांना महापौरपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार न देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि म्हटले की, महापौरपदाच्या निवडणुकीत नामनिर्देशित नगरसेवकांना मतदान करता येणार नाही. यासोबतच महापौर निवडणुकीची तारीख 24 तासांत जाहीर करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आता दिल्लीला आज महापौर मिळतो का, की या सभेचेही मागील सभांप्रमाणेच गदारोळात रूपांतर होते, हे पाहाणे औत्सुक्याचे आहे.

हेही वाचा : UP Budget 2023 : योगी सरकारचा आज अर्थसंकल्प, अनेक लोकप्रिय घोषणांची शक्यता, वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.