ETV Bharat / bharat

Delhi Kanjhawala case : 'अंजलीने दारू प्यायली नव्हती', पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये खुलासा

दिल्लीतील कंझावाला प्रकरणात (Delhi Kanjhawala case) मृत अंजलीचा अंतिम पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे. (postmortem report of anjali). यामध्ये तिच्यासोबत बलात्कार झाल्याची पुष्टी झालेली नाही. ती दारूच्या नशेत नव्हती याचीही पुष्टी झाली आहे. मंगळवारी तिच्या मैत्रिणीने दावा केला होता की तिने दारू प्यायली होती. आता पोलिस प्रकरणाची पुन्हा चौकशी करणार आहेत.

author img

By

Published : Jan 4, 2023, 11:06 PM IST

Delhi Kanjhawala case
Delhi Kanjhawala case
निधीचा शेजारी

नवी दिल्ली : दिल्लीच्या कंझावाला येथील अंजलीच्या मृत्यूप्रकरणी (Delhi Kanjhawala case) रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अंजलीच्या अंतिम पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नवा खुलासा झाला आहे. यामध्ये तिच्या मद्यपानाची पुष्टी झालेली नाही. (postmortem report of anjali). यापूर्वी अंजलीची मैत्रिण निधीने तिच्या दारू पिण्याबाबत सांगितले होते. आता बयाण आणि अहवालातील विरोधाभासामुळे पोलिस निधीची पुन्हा चौकशी करणार आहेत.

postmortem report of anjali
अंजलीचा अंतिम पोस्टमॉर्टम रिपोर्ट

निधीच्या वक्तव्यात तफावत : निधीच्या म्हणण्यानुसार, अंजलीने जास्त प्रमाणात दारूचे सेवन केले होते. तिने सांगितले की, अपघाताच्या वेळी ती तिच्यासोबत होती आणि अपघाता नंतर ती घाबरून तिच्या घरी गेली. पण इथेही निधीच्या वक्तव्यात तफावत आहे. एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे, ज्यामध्ये निधी स्वतःच्या घरी न जाता दुसऱ्याच्या घरी जाताना दिसते आहे.

postmortem report of anjali
अंजलीचा अंतिम पोस्टमॉर्टम रिपोर्ट

जास्त रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू : पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये अंजलीने दारू प्यायली नसल्याची पुष्टी झाली आहे. यासोबत बलात्कारासारख्या घटनेची चर्चा नाही. अंजलीच्या शरीरावर 40 ठिकाणी खोल जखमांच्या खुणा असल्याचेही अहवालात समोर आले आहे. पाठ पूर्णपणे सोललेली होती. निधीच्या शेजारच्या मुलाने सांगितले की, 1 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजता निधी फोन चार्जिंगसाठी त्यांच्या घरी आली होती आणि नंतर पुन्हा फोन घेऊन निघून गेली. रिपोर्टनुसार, जास्त रक्तस्त्राव झाल्याने अंजलीचा मृत्यू झाला. अहवालात दोन्ही पाय, डोके, पाठीचा कणा आणि डाव्या मांडीच्या हाडाला गंभीर दुखापत झाल्याने रक्त वेगाने वाहत होते. अंजलीला झालेल्या सर्व दुखापती कार अपघातामुळे आणि कारखाली फरफटल्याने झाल्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

postmortem report of anjali
अंजलीचा अंतिम पोस्टमॉर्टम रिपोर्ट

कारच्या आत रक्ताचे डाग नाहीत : सोमवारी, फॉरेन्सिक सायन्स लॅब (एफएसएल) ला बलेनो कारच्या तपासणीत कोणत्याही प्रकारचे रक्त आढळले नाही. तसेच निधीच्या केसांचे तुकडेही गाडीत सापडले नाहीत. फॉरेन्सिक तपासणीत कारच्या टायरमध्ये रक्ताचे अंश आढळून आले आहेत.

निधीने दिली होती धक्कादायक माहिती : मृत अंजलीची मैत्रिण निधी हिने मंगळवारी प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, बलेनो कारने समोरून धडक दिली होती. धडकेनंतर ती बाजूला पडली आणि अंजली गाडीखाली आली. ती (अंजली) खूप नशेत होती. निधीचा आरोप आहे की, मुलगी गाडीखाली अडकली आहे हे मुलांना माहीत होते. तरीही ते गाडी चालवत होते. ती रडत होती, तरीही त्यांनी गाडी थांबवली नाही. गाडीने मृत मुलीला दोनदा पुढे नेले आणि दोनदा मागे नेले. त्यानंतर पुढे नेले.

काय आहे प्रकरण : 1 जानेवारीच्या पहाटे दिल्लीच्या कंझावाला परिसरात एका तरुणीला कारने 13 किमीपर्यंत फरफटत नेले. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला असून तिचा विवस्त्र मृतदेह पोलिसांनी जप्त केला. यासंदर्भात पहाटे पोलिसांना फोन आला होता. कारमध्ये पाच आरोपी होते आणि पोलिसांनी एकाच दिवशी सर्व आरोपींना अटक केली.

आरोपींची ओळख : 26 वर्षीय दीपक खन्ना हा व्यवसायाने ग्रामीण सेवेचा चालक आहे. दुसरा आरोपी अमित खन्ना (25 वर्षे) हा उत्तम नगर येथील एसबीआय कार्ड कंपनीत काम करतो. तिसरा आरोपी कृष्णा (27 वर्षे) हा स्पॅनिश कल्चर सेंटरमध्ये काम करतो. चौथा आरोपी मिथुन (26 वर्षे) हा नारायणा येथील हेअर ड्रेसर सलूनमध्ये काम करतो आणि पाचवा आरोपी मनोज मित्तल (27 वर्षे) हा रेशन विक्रेता असून दिल्लीच्या सुलतानपुरी भागातील पी ब्लॉकमध्ये रेशन दुकान चालवतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.