नवी दिल्ली - अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या (Delhi High Court) पीठाने अभिनेता सुशांतसिंह राजपूतवरील (Actor Sushant Singh Rajput) डॉक्यूमेंट्री फिल्म तयार करण्याची स्थगिती देण्याची याचिका अमान्य केली आहे. न्यायमूर्ती अनूप जयराम भांभानी यांच्या अध्यक्षतेखालील सुट्टीकालीन पीठाने याचिकेवरील पुढील सुनावणी २५ जूनला करण्यात येणार असल्याचे आदेश दिले आहेत.
सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणीची काय घाई आहे, असा प्रश्न याचिकर्त्याला विचारला. जे चित्रपट यापूर्वी प्रदर्शित झाले आहेत, त्यांचे प्रदर्शन आम्ही थांबवू शकतो का? असा प्रश्नही उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारला.
हेही वाचा-अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक
सुशांतसिंह राजपूत याचे वडील के. के. सिंह यांच्यावतीने जयंत मेहता यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यांनी न्यायालयाला सांगितले, की आमच्या माहितीप्रमाणे सुशांतसिंह यांच्यावरील सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. वकील वेदांत वर्मा यांनी सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर ११ जूनला प्रदर्शित झाल्याचे सांगितले. न्याय सिनेमाचे निर्माता सरला सरावगी यांचे वकील चंदर लाल यांनीही सिनेमा प्रदर्शित झाल्याचे सांगितले. वरिष्ठ वकील हरीष साळवे यांनी २४ जूनवर सुनावणी करण्याची मागणी केली. न्यायालयाने २५ जूनला सुनावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा-अदर पूनावाला पुण्यात परतले, मोठ्या नेत्यांकडून धमक्या मिळत असल्याने सोडला होता देश
सुशांतसिंह राजपूतचे जीवन आणि सिनेमाचा संबंध नाही
दिल्ली उच्च न्यायालयाच्या पीठाने सुशांतसिंह राजपूत यांचे वडील के. के. सिंह यांची १० जूनला याचिका रद्द केली होती. सुनावणीदरम्यान, फिल्म शंशाकचे निर्मात्यावतीने वकील एस. पी. सिंह यांनी सुशांतसिंह राजपूत याचे जीवन आणि सिनेमाचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते.
हेही वाचा-रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आठवड्यात दुसऱ्यांदा शरद पवारांची घेतली भेट
अनेक बायोपिक सिनेमांचे काम सुरू-
याचिकेत म्हटले की न्याय, द जस्टिस, सुसाईड या मर्डर ए स्टार वॉज लॉस्ट आणि शशांक नावाच्या बायोपिक आणि डॉक्युमेंट्री तयार होत आहेत. काही लोक सुशांतसिंहच्या खासगी जीवनावर वेब सीरीज बनवू शकतात. त्यामुळे खासगी जीवनाच्या अधिकाराचा हक्क हिरावला जात असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
मोबदल्याची मागणी-
कोणत्याही सेलिब्रिटीला खासगी जीवन जगण्याचा अधिकार आहे. सुशांतसिंह राजपूतच्या पित्याने अभिनेता सुशांतसिंह याचे सर्व फोटो आणि व्हिडिओ हे कुटुंबाचे कॉपीराईट असल्याचे याचिकेत म्हटले आहे. फिल्म किंवा वेब सीरीज निर्मात्याकडून कॉपीराईटचा भंग होत असल्याचा के. के. सिंह यांनी यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यांनी सिनेमा आणि डॉक्युमेंट्री बनविणाऱ्याकडून २ कोटीहून अधिक दंडाची मागणी केली आहे.