नवी दिल्ली : जामीया हिंसा प्रकरणात आसिफ इकबाल तन्हा आणि शर्जील इमामसह 11 आरोपींच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. दिल्ली पोलिसांच्या पुनर्विचार याचिकेवर ही नोटीस जारी करण्यात आली आहे. यावेळी उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाने दिलेले निरीक्षण आरोपींच्या कोणत्याही खटल्यावर प्रभाव पाडणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट केले. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 मार्चला ठेवली आहे. तर ट्रायल कोर्टाची पुढील सुनावणी 20 एप्रिलला ठेवण्यात आल्याचेही न्यायालयाने सांगितले. त्यासह स्टे ऑर्डरची कोणतीही गरज नसल्याचे न्यायालयाने यावेळी यावेळी स्पष्ट केले.
प्रकरणावर कोणताही परिणाम होणार नाही : जामीया हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी विद्यार्थी नेता शर्जील इमामसह 11 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी या प्रकरणातील पुढील पोलीस तपासावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले. दिल्लीतील जामीया इस्लामीया विद्यापीठात दंगा भडकावल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी शर्जील इमामसह अनेकांवर गुन्हा दाखल केला होता.
दंगा भडकावण्याचा होता आरोप : ट्रायल कोर्टाने 4 फेब्रुवारीला शरजील इमाम, आसिफ इकबाल तन्हा, सफूरा जरगर, मोहमद अबुजर, उमैर अहमद, मोहमद शोएब, महमूद अनवर, मोहमद कासिम, मोहमद बिलाल नदीम, शहजर रजा खान आणि चंदा यादव यांना जामीन दिला होता. तर केवळ मोहमद इलियास विरोधात आरोप निश्चित करण्यात आला होता. दिल्लीतील साकेत परिसरातील सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती अरुल अग्रवाल यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला होता. याप्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 143, 147, 148, 149, 186, 353, 332, 333, 308, 427, 435, 323, 341, 120 बी आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने मोहमद इलियास याच्याविरोधात अवैधपणे सभेचे आयोजन करुन भडकाऊ भाषण केल्याचा आरोप करण्यात आला होता.
सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात केले होते आंदोलन : न्यू फ्रेंडस कॉलनीत काही आंदोलकांनी सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात आंदोलन करताना रोड ठप्प केल्याची माहिती दिल्ली पोलिसांना 15 डिसेंबरला मिळाली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना दिल्ली पोलिसांना विद्यार्थी नेता शर्जील इमामने 13 डिसेंबर 2019 ला या परिसरात भडकाऊ भाषण केल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर 15 डिसेंबरला आंदोलकांनी अग्रेसर होत हिंसक आंदोलन केले होते. त्यामुळे पोलिसांनी विद्यार्थी नेता शर्जील इमाम याच्याविरोधात देशद्रोह आणि दोन समाजात तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा - LTTE Prabhakaran : एलटीटीई सुप्रीमो प्रभाकरन जिवंत आहे - तमिळ समर्थक नेता नेदुमारन