नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने येस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राणा कपूरला ( CEO of YES Bank Rana Kapoor ) मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला ( Court grants bail ) आहे. त्याच्यावर ४६६.५१ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आहे.
दरम्यान, राणा कपूर यांच्या बँकेकडून कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठ्या कंपनींना हजारो कोटी रुपये कर्ज देण्यात आले होते. यानंतर राणा कपूर यांच्या कुटुंबातील काही सदस्यांच्या बँक खात्यात अचानक मोठ्या रकमा जमा करण्यात आल्या होत्या. यात राणा कपूर यांच्या पत्नीच्या बँक खात्यातही पैसे जमा झाले होते.ईडी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राणा कपूर यांच्या कुटुंबातील काही सदस्यांच्या बँक खात्यात 600 कोटीहून अधिक रक्कम जमा झाली होती. ही रक्कम डिएचएफएल सारख्या कर्ज बुडविणाऱ्या कंपनीकडून देण्यात आले होते. या प्रकरणी राणा कपूर यांची पत्नी बिंदू व तीन मुलींची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे.