ETV Bharat / bharat

अभिनेत्री जुही चावलाची 5जी विरोधातील याचिका फेटाळली; ठोठावला 20 लाखांचा दंड

अभिनेत्री जुही चावलाने भारतात 5जी टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही 5जी विरोधातील याचिका दिल्ली हायकोर्टानं फेटाळली आहे. तसेच तीला 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

अभिनेत्री जुही चावला
अभिनेत्री जुही चावला
author img

By

Published : Jun 4, 2021, 5:27 PM IST

नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेत्री जुही चावलाची 5-जी लॉन्च करण्याविरोधातील याचिका फेटाळली आहे. तसेच जुही चावलाला 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 31 मे ला जुही चावलाने 5 जी विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर 2 जूनला सुनावणी झाली होती. सुनावणीनंतर निर्णय सुरक्षित ठेवण्यात आला होता.

याचिका दाखल करण्यापूर्वी याचिकाकर्त्याने याची माहिती सरकारला द्यायला हवी होती. तसेच याचिकाकर्त्याकडून न्यायालयात कोणतीही साक्ष दिली नाही, असे न्यायालायने सुनावणीदरम्यान म्हटलं. दरम्यान, 2 जुनला झालेल्या सुनावणीत जुही चावलाने ट्विट करुन लोकांना या सुनावणीत सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर सुनावणीदरम्यान एका फॅननं थेट जुही यांच्या चित्रपटातील गाणं गाण्यास सुरुवात केली होती. त्यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

जूही चावलाने 5-जी लॉन्च करण्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मी काही अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या विरोधात नाही. मात्र, 5 जी चा परिणाम मानवी आरोग्यावर होतो, म्हणून ते रोखले पाहिजे, असे तीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं होते. तसेच 5 जी येण्याअगोदर त्याच्या रेडिएशनचा लोकांच्या प्रकृतीवर काय परिणाम होईल, त्याचा अभ्यास व्हायला हवा. 5 जी हे मानवांसाठी सुरक्षित आहे, हे सिद्ध झालेले नाही. अशा परिस्थितीत हे तंत्रज्ञान सुरू होण्यापासून रोखले पाहिजे, असेही तीच्या प्रवक्त्याने म्हटलं होते.

रेडिएशन लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम -

रेडिएशन लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम करतो. रेडिएशनमुळे अनेकांनी काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर होण्याची भीती व्यक्त केली आहे. दरम्यान, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वित्झरलँड आणि अमेरिकेतल्या काही प्रातांमध्ये 5 जी ही सेवा सुरू झाली आहे. भारतानेही ५ जी सुरू करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. नोकिया कंपनीकडून ५ जी, क्लाउट आणि डिजीटल पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यात येणार आहे.

5 जी ची सेवा कार्यान्वित होणार -

भारतीय टेलिकॉम क्षेत्रात आधी 2 जी, 3 जी आणि आता 4 जीची वापर सुरू आहे. मात्र, आता याही पुढे जात 5 जी येत आहे. मागील कित्येक महिन्यांपासून देशात लवकरच 5 जी ची सेवा कार्यान्वित केली जाईल असे सांगितले जात आहे. त्या दिशेने आता पावलंसुद्धा टाकली जात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.