नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने ( Delhi High Court ) अभिनेत्री जुही चावला ( Actoress Juhi Chawla ) हिला दिसाला दिला आहे. भारतात ५जी नेटवर्क लॉन्च करणे थांबवा, अशी याचिका जुहीने उच्च न्यायालयाद दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने ठोठावलेली २० लाख रुपये दंडाची रक्कम न्यायमुर्ती विपिन सांघी यांच्या खंडपीठाने कमी करत दोन लाख रुपये इतकी केली आहे.
मंगळवारी (दि. २५ जानेवारी) जुही चावला यांचे वकील सलमान खुर्शिद यांना सांगितले होती की, पूर्वीच्या खंडपीठाने ठोठावलेला दंड पूर्णपणे माफ करता येत नाही. मात्र, अभिनेत्री जुही चावला या सेलिब्रेटी आहेत. त्यांंच्या दंडाची रक्कम दोन लाख रुपये करण्यात येईल. पण, त्यांना दिल्ली सरकारच्या विधी सेवा प्राधिकरणासाठी सामाजिक कार्य करावे लागेल.
त्यानंतर गुरुवारी (दि. २७ जानेवारी) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या सुनावणीत अभिनेत्री जुही चावला हिने विधी सेवा प्राधिकारणासाठी सामाजिक कार्य करायला मला आवडेल, असे सांगितले.
काय आहे प्रकरण…? - ४ जुन, २०२१ रोजी एकल न्यायमूर्ती असलेल्या जेआर मिधा यांच्या खंडपीठाने जुही चावलाची ५ जी वायरलेस नेटवर्क उभारणे थांबविण्याबाबतची याचिका फेटाळून लावली होती. तसेच अभिनेत्री जुहीने यासाठी लागणरी कोर्ट फी जमा केली नाही, यासाठी तब्बल २० लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. ही रक्कम एका आठवड्यात जमा करावी, असे आदेश दिले होते.
त्यावेळी न्यायालयाने जुहीला फटकारत म्हटले होते की, याचिकाकर्त्याने याबाबतचे सबळ पुरावे न्यायालयात सादर केले नाहीत. तसेच याचिका दाखल करण्यापूर्वी सरकारला नोटीस देणे गरजेचे होते. मात्र, तसे तिने केले नाही.