नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत आता वर्षातील केवळ तीन दिवसच ड्राय डे ( Dry Day in Delhi ) असणार आहे. या संबंधित दिल्ली उत्पादन शुल्क विभागाने ( Delhi Excise Department ) आदेश काढले आहेत. त्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, प्रजासत्ताक दिन ( Republic Day ), स्वातंत्र्य दिन ( Independence Day ) आणि महात्मा गांधी जयंती ( Mahatma Gandhi Jayanti ) या तीन दिवसच दिल्लीत ड्राय डे असणार आहे. यापुर्वी दिल्लीत वर्षातील 21 दिवस ड्राय डे होते.
'या' तीन दिवस ड्राय डे -
दिल्ली उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केलेल्या आदेशानुसार, ड्राय डे ची संख्या कमी करुन तीन करण्यात आली आहे. दिल्लीत 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन आणि 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी जयंती या तीन दिवस ड्राय डे असणार आहे. याव्यतिरिक्त सरकार हे वेळोवेळी आदेश काढुन त्या-त्या दिवशी ड्राय डे घोषित करू शकते.
विरोधी पक्षाचा नव्या धोरणाला विरोध -
माहितीनुसार दिल्ली सरकारने ( Delhi Government ) नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले आहे. या धोरणाला विरोधी राजकीय पक्ष आणि RWA विरोध करत आहेत.
हेही वाचा - Corona Update : भारतात गेल्या 24 तासात कोरोना रुग्ण संख्येत घट