ETV Bharat / bharat

Delhi Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी उत्तर भारत हादरला, दिल्लीतही जाणवले धक्के

Delhi Earthquake : रविवारी (१५ ऑक्टोबर) दुपारी राजधानी दिल्ली आणि आजूबाजूचा परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. हरियाणातील फरिदाबाद हे या भूकंपाचं केंद्र होतं.

Earthquake
Earthquake
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2023, 4:58 PM IST

नवी दिल्ली Delhi Earthquake : दिल्ली-एनसीआरमध्ये रविवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दिल्लीसह नोएडा आणि गाझियाबादमध्येही जमीन हादरली. हरियाणाच्या अनेक भागातही हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मात्र, या भूकंपात कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही.

हरियाणातील फरिदाबाद भूकंपाचं केंद्र : नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये आज आलेल्या भूकंपाची तीव्रता ३.१ इतकी होती. दुपारी ४.०८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. हरियाणातील फरिदाबाद हे भूकंपाचं केंद्र असल्याचं सांगण्यात येत आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं लोक आपापल्या घरात होते. मात्र जमीन हादरताच लोकांनी घराबाहेर धाव घेतली. यापूर्वी ३ ऑक्टोबर रोजी दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते.

भूकंपाच्या तीव्रतेनुसार काय परिणाम होऊ शकतो : ० ते १.९ रिश्टर स्केलचा भूकंप केवळ सिस्मोग्राफद्वारे ओळखला जाऊ शकतो. २ ते २.९ तीव्रतेचा भूकंप आल्यास सौम्य धक्के बसतात. जेव्हा ३ ते ३.९ रिश्टर स्केलचा भूकंप होतो तेव्हा त्याचा परिणाम जवळून जाणाऱ्या ट्रकसारखा होतो. ४ ते ४.९ तीव्रतेचा भूकंप आल्यास खिडक्या फुटू शकतात. तसेच भिंतींवर टांगलेल्या फ्रेम्स पडू शकतात. ५ ते ५.९ रिश्टर स्केलचा भूकंप आल्यास फर्निचर हलू शकते. ६ ते ६.९ तीव्रतेचा भूकंप आल्यास इमारतींना तडे जाऊ शकतात. तसेच वरच्या मजल्यांचं नुकसान होऊ शकते.

भूकंप का होतात? : पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग सात टेक्टोनिक प्लेट्सपासून बनलेला आहे. या प्लेट्स जिथे जिथे एकमेकांवर आदळतात तिथे भूकंपाचा धोका असतो. जेव्हा या प्लेट्स एकमेकांच्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा भूकंप होतो. प्लेट्स एकमेकांवर घासतात आणि त्यातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. त्या घर्षणामुळे जमीन थरथरायला लागते.

हेही वाचा :

  1. Afghanistan Earthquake : भय इथलं संपत नाही! दुसऱ्या भूकंपानं अफगाणिस्तान पुन्हा हादरलं
  2. Afghanistan Earthquake : शक्तिशाली भूकंपानं अफगाणिस्तानमध्ये त्राहीमाम; 30 मिनिटांत 4 धक्के, 2000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू
  3. Afghanistan Earthquake : भूकंपाच्या धक्क्यानं अफगाणिस्तान हादरलं; 320 नागरिकांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.