ETV Bharat / bharat

Delhi Crime : दिल्ली महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या हत्येचा दोन वर्षानंतर उलगडा, तपासाकरिता पाठपुरावा करणारा 'तो' निघाला आरोप - delhi latest crime news

दिल्लीत महिला कॉन्स्टेबलच्या हत्येचे कोडे दोन वर्षानंतर उलगडले आहे. या प्रकरणी दिल्ली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली आहे.

Delhi Crime
Delhi Crime
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2023, 12:16 PM IST

नवी दिल्ली : दोन वर्षांपूर्वी दिल्ली पोलिसांच्या महिला कॉन्स्टेबलची हत्या झाल्यानंतर आरोपी मोकाट फिरत होते. अखेर दिल्ली गुन्हे शाखेने मुख्य आरोपीसह तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. 8 सप्टेंबर 2021 रोजी दिल्ली पोलिसांच्या हेड कॉन्स्टेबलने महिला कॉन्स्टेबलची हत्या करून आरोपींनी तिचा मृतदेह नाल्यात दगड टाकून पुरला होता.

पोलिसांनी दिल्ली पोलिसातील आरोपी हेड कॉन्स्टेबल सुरेंद्र, त्याचा मेहुणा रविन आणि त्याचा मित्र राजपाल यांना अटक केली आहे. आरोपी सुरेंद्रने महिला कॉन्स्टेबलला नाल्यात पुरल्याचे सांगितले. त्याच्या सागंण्यावरून पोलिसांनी महिला कॉन्स्टेबलचा सांगाडाही नाल्यातून बाहेर काढला. हा सांगाडा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवून महिला कॉन्स्टेबलच्या मृत्यूची खात्री करण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे.

  • #WATCH | Delhi: On a woman constable's murder, Ravindra Yadav, Special CP (Crime), says, "Unfortunately, the accused is head constable driver in Delhi Police...He is posted in PCR. The girl was also posted in PCR earlier...He befriended her and then started misguiding her...For… https://t.co/up5T3bCk9i pic.twitter.com/kPKsmrwyIM

    — ANI (@ANI) October 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अविवाहित असल्याचे सांगून प्रेमकरण- क्राइम ब्रँचचे विशेष आयुक्त आर. एस. यादव म्हणाले, आरोपी सुरेंद्र 2012 मध्ये दिल्ली पोलिसात हेड कॉन्स्टेबल म्हणून भरती झाला होता. पत्नी आणि 12 वर्षाच्या मुलासह अलीपूर राहत असताना त्याची ड्युटी पीसीआरमध्ये होती. सुरेंद्रची ओळख 2019 मध्ये पीसीआरमध्येच तैनात असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलबरोबर झाली. काही महिन्यांनंतर महिला कॉन्स्टेबलची यूपी पोलिसात एसआय पदासाठी निवड झाली. यानंतर तिने दिल्ली पोलिसांचा राजीनामा देऊन यूपीएससीची तयारी सुरू केली. अविवाहित असल्याचे सांगून सुरेंद्रने तिच्याशी मैत्री करून प्रेमप्रकरण सुरू ठेवले.

प्रेयसीला विवाह झाल्याची माहिती समजल्यावर हत्या : विशेष आयुक्त आर. एस. यादव म्हणाले, सुरेंद्र विवाहित असून आपली फसवणूक करत असल्याचे तरुणीला समजल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. एकेदिवशी तिला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने यमुना नदीच्या काठी नेऊन गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी पीडितेची बॅग व फोन आदी घेऊन मृतदेह नाल्यात फेकून दगड टाकून पुरला. यानंतर आरोपीनंच पीडितेच्या कुटुंबीयांसह पोलीस ठाण्यात पीडिता हरवल्याची तक्रार दाखल केली. महिलेच्या कुटुंबीयांसह तो दिल्ली पोलिसांच्या उच्च अधिकाऱ्यांकडे जाऊन पीडितेला शोधण्याची विनंती करत होता. तिच्या घरच्यांना त्याच्यावर संशय आला नाही. या वर्षी महिलेच्या खुनाच्या तपासाचे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग आल्यानंतर चक्रे फिरली.

पोलिसांसह कुटुंबाची आरोपींकडून दिशाभूल- सुरेंद्रचा मेहुणा रवीन हा कॉल गर्ल्ससह हरियाणा, डेहराडून, ऋषिकेश आणि मसुरी सारख्या शहरातील हॉटेलमध्ये गेला. तेथून तो पीडितेच्या घरी फोन करून पीडिता आपल्यासोबत असल्याचे सांगत पोलीस आणि पीडितेच्या कुटुंबाची दिशाभूल करत होता. त्यामुळे पीडितेला तिच्या आई-वडिलांकडे जायचे नसल्याचा पोलिसांचा गैरसमज झाला. फोन नंबर ट्रेस करताना क्राइम ब्रँचचे पथक रविन आणि सुरेंद्रपर्यंत पोहोचल्यानंतर संपूर्ण हत्या प्रकरणाचा उलगडा झाला.

हेही वाचा-

  1. Pune Crime News : पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर 2 कोटीचे अमली पदार्थ जप्त; पोलिसांचा तपास सुरू
  2. Stone Pelting In Shahada : शहादा दगडफेक प्रकरणात पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; 200 जणांविरुद्ध गुन्हे दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.