अहमदाबाद: आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी रात्री अहमदाबादमधील CM Kejriwal Ahmadabad visit एका ऑटो-रिक्षा चालकाचे आमंत्रण स्वीकारले आणि त्याच्या घरी जेवण CM Kejriwal Dinned at auto driver house केले. पण, त्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हॉटेलबाहेर तैनात असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांशी सुरक्षा प्रोटोकॉलवरून आप नेत्यांनी जोरदार वाद Heated debate Kejriwal and police officials घातला. केजरीवाल आम आदमी पक्षाच्या काही नेत्यांसोबत ऑटोरिक्षात बसून त्यांच्या घरी गेले आणि तिथे जेवण केले. CM Kejriwal dinner Ahmadabad at auto driver house
प्रोटोकॉलवरून पोलिसांशी वादावादी - यावर प्रतिक्रिया देताना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची खरडपट्टी काढली आणि त्यांना ‘अभिनेता’ म्हटले. ऑटो-रिक्षा चालकाच्या घरी जाण्यापूर्वी, दिल्लीचे मुख्यमंत्री पोलिसांना सोबत घेण्यास तयार नसल्यामुळे सुरक्षा प्रोटोकॉलवरून पंचतारांकित हॉटेलच्या बाहेर काही पोलिस अधिकार्यांशी केजरीवाल यांचा जोरदार वाद झाला. या हॉटेलमध्ये केजरीवाल यांचा मुक्काम आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपच्या प्रचाराचा भाग म्हणून गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या केजरीवाल यांनी दुपारी अहमदाबादमध्ये रिक्षाचालकांच्या मेळाव्याला संबोधित केले.
केजरीवालांचा ऑटो-रिक्षातून प्रवास - केजरीवाल यांच्या संबोधनानंतर शहरातील घाटलोडिया भागात राहणाऱ्या विक्रम दंतानी नावाच्या रिक्षाचालकाने त्यांना त्यांच्या घरी जेवण करण्याची विनंती केली. त्यावर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी लगेच 'हो' असे उत्तर दिले. केजरीवाल यांनी त्यांना त्यांच्या ऑटो-रिक्षातून घरी नेण्याचा आग्रह केला तेव्हा दंतानी यांनी होकार दिला. आम आदमी पार्टीच्या गुजरात युनिटचे अध्यक्ष गोपाल इटालिया आणि पक्षाचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस इसुदान गढवी हे देखील केजरीवाल यांच्यासोबत ऑटो-रिक्षातून दंतानी यांच्या घरी गेले. सुरक्षा प्रोटोकॉलवर वाद झाल्यानंतर, एक पोलिस अधिकारी ऑटो-रिक्षा चालकाच्या बाजूला बसला तर दोन पोलिस वाहने ऑटो-रिक्षासोबत जात होती. केजरीवाल आणि अन्य आप नेत्यांनी दंतानी यांच्या घरी जमिनीवर बसून जेवण केले.