नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शनिवारी कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी जंतरमंतरवर पोहोचले. कुस्तीपटूंच्या या आंदोलनात संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की, आमच्या कुस्तीपटूंनी देशाचा नावलौकिक वाढवला आहे. मात्र, गेल्या आठवडाभरापासून त्यांना आंदोलन करावे लागत आहे ही दुर्दैवाची बाब आहे असही ते म्हणाले आहेत. दुपारी ४ वाजता केजरीवाल जंतरमंतरवर पोहोचले. याचवेळी ते म्हणाले आमच्या समाजात महिलांना पुढे येण्यापासून रोखले जाते. पण आमच्या मुलींनी देशाचं नाव कमावलं आहे. जो दोषी असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे ते म्हणाले आहेत. संपूर्ण देश आंदोलक पैलवानांच्या पाठीशी उभा आहे. दिल्ली सरकारही त्यांच्यासोबत आहे असही ते म्हणाले आहेत.
-
पूरी दुनिया में देश का नाम रोशन करने वाली ये सभी महिला खिलाड़ी हमारी बेटियाँ हैं, इन्हें इंसाफ़ मिलना ही चाहिए। आरोपी चाहे जितना भी शक्तिशाली हो, उसे सख़्त से सख़्त सज़ा मिलनी चाहिए। https://t.co/GeTVVl38Mz
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">पूरी दुनिया में देश का नाम रोशन करने वाली ये सभी महिला खिलाड़ी हमारी बेटियाँ हैं, इन्हें इंसाफ़ मिलना ही चाहिए। आरोपी चाहे जितना भी शक्तिशाली हो, उसे सख़्त से सख़्त सज़ा मिलनी चाहिए। https://t.co/GeTVVl38Mz
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 29, 2023पूरी दुनिया में देश का नाम रोशन करने वाली ये सभी महिला खिलाड़ी हमारी बेटियाँ हैं, इन्हें इंसाफ़ मिलना ही चाहिए। आरोपी चाहे जितना भी शक्तिशाली हो, उसे सख़्त से सख़्त सज़ा मिलनी चाहिए। https://t.co/GeTVVl38Mz
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 29, 2023
एफआयआर नोंदवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात : यावेळी केजरीवाल यांनी भाजप आणि केंद्र सरकार बदमाशांना संरक्षण देत असल्याचा थेट आरोप केला आहे. केजरीवाल म्हणाले की भाजपच्या एकाही माणसाने चूक केली तर भाजपची संपूर्ण यंत्रणा त्याला वाचवण्यात गुंतलेली असते. तसेच, भाजपमध्ये जर कोणी चुकीचे काम केले, कुणी बलात्कार केला तर लोकांना एफआयआर नोंदवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
देशाच्या मुलींना आपण न्याय देऊ शकत नाही : केजरीवाल यांच्या आधी शनिवारी प्रियंका गांधी आणि काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी जंतरमंतरवर पोहोचले होते. दरम्यान, याप्रकरणी शनिवारी सकाळी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी पत्रकार परिषदेत घेतली. त्यामध्ये आपल्यावर करण्यात आलेले आरोप निराधार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासोबतच कुस्तीपटू रोज आपल्या मागण्या बदलत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आदल्या दिवशी दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी जंतरमंतरवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. देशाच्या मुलींना आपण न्याय देऊ शकत नाही तर काय करता असा थेट प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हेही वाचा : कुस्तीपटूंना न्याय मिळेल का, दिग्गज खेळाडूंचा सवाल, प्रियंका गांधीही आंदोलकांना भेटल्या