ETV Bharat / bharat

शेतकरी आंदोलनाचा २६वा दिवस; आज पुन्हा एकदिवसीय उपोषण - दिल्ली शेतकरी आंदोलन उपोषण

गेल्या २५ दिवसांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्राने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी आज शेतकऱ्यांनी पुन्हा उपोषणाचा निर्धार केला आहे. यासोबतच २५ ते २७ डिसेंबरपर्यंत हरियाणाच्या सर्व महामार्गांवरील टोल वसूली करु देणार नसल्याचेही आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Delhi Chalo protest against center's farm acts day 26 Updates farmers to hold day long fast
शेतकरी आंदोलनाचा २६वा दिवस; आज पुन्हा एकदिवसीय उपोषण
author img

By

Published : Dec 21, 2020, 8:44 AM IST

नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा आज २६वा दिवस आहे. यासाठी आज शेतकऱ्यांनी पुन्हा उपोषणाचा निर्धार केला आहे. यासोबतच २५ ते २७ डिसेंबरपर्यंत हरियाणाच्या सर्व महामार्गांवरील टोल वसूली करु देणार नसल्याचेही आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

गेल्या २५ दिवसांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्राने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. ४० प्रमुख शेतकरी संघटनांसह देशभरातील सुमारे ५०० कृषी संघटना या आंदोलनात सहभागी आहेत. तसेच, कित्येक विरोधी पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

शेतकरी दिनादिवशी उपवासाचे आवाहन..

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी देशातील नागरिकांना आवाहन केले आहे, की २३ डिसेंबरला दुपारचे जेवण टाळून शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दर्शवावा. यादिवशी शेतकरी दिल्लीच्या सीमेवरच शेतकरी दिन साजरा करणार आहेत.

दोन दिवसात कृषीमंत्री घेणार शेतकऱ्यांची भेट..

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे येत्या दोन दिवसांमध्ये दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतील, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. "मला नक्की तारीख किंवा वेळ माहिती नाही. मात्र, उद्या किंवा परवा तोमर शेतकऱ्यांशी चर्चा करतील" असे शाहांनी रविवारी स्पष्ट केले.

सरकारचे शेतकऱ्यांना पुन्हा चर्चेसाठी निमंत्रण..

दिल्लीमध्ये सुरू असलेले आंदोलन लवकरात लवकर संपावे यासाठी सरकारने पुन्हा शेतकऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. यापूर्वी कृषी कायद्यांमध्ये केलेल्या बदलांनंतर तुमच्या याबाबत काय अडचणी आहेत, याबाबत चर्चा करण्यासाठी एक ठराविक तारीख निश्चित करुन आम्हाला कळवावी अशा आशयाचे पत्र सरकारने कृषी संघटनांना पाठवले आहे.

हेही वाचा : 'पंतप्रधानांच्या 'मन की बात' कार्यक्रमावेळी वाजवाव्या थाळ्या'; शेतकऱ्यांचे देशवासियांना आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.