नवी दिल्ली - आयपीएल 2022 च्या 50 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा 21 धावांनी पराभव केला. या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. ( Delhi Capitals v Sunrisers Hyderabad ) यासह हैदराबादने पराभवाची हॅट्ट्रिक केली असून ते सहाव्या स्थानावर आहेत. प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नर आणि रोव्हमन पॉवेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्लीने हैदराबादसमोर 208 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येसमोर हैदराबादला केवळ 186 धावा करता आल्या. पूरनने 62 धावांची शानदार खेळी खेळली, तर खलील अहमदने दिल्लीकडून सर्वाधिक तीन बळी घेतले.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी 208 धावांचे लक्ष्य दिले. दिल्ली कॅपिटल्सकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ५८ चेंडूत ९२ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरशिवाय रोव्हमन पॉवेलने 35 चेंडूत 67 धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 186 धावाच करू शकला.
सामन्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन म्हणाला, "दिल्ली कॅपिटल्सने चांगली फलंदाजी केली. ग्राऊंड छेटो होते तसेच, पावसाच्या फटकाऱ्यामुळे काही प्रमाणात दवही होते. आमच्या विकेट्स शिल्लक राहिल्या असत्या तर परिस्थिती वेगळी असती. आम्ही त्यांना दबाव निर्माण करण्याची संधी दिली असही तो म्हणाला.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन म्हणाला, “एक संघ म्हणून आमच्यावर दबाव होता. अजून काही सामने बाकी आहेत आणि आम्हाला गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. मोठ्या भागीदारी कराव्या लागतील.' दिल्ली आता दहा सामन्यांतून दहा गुणांसह पाचव्या स्थानावर आहे, पॉइंट टेबलमध्ये दोन स्थानांचा फायदा झाला आहे. त्याचवेळी सलग तिसऱ्या पराभवानंतर सनरायझर्सची गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे.
हेही वाचा - Snowfall in Kedarnath : केदारनाथ धाममध्ये मे महिन्यातही बर्फवृष्टी; उद्या मंदिर भक्तांसाठी खुले होणार