नवी दिल्ली Delhi Bus Fire : जयपूरवरुन दिल्लीला येणाऱ्या खासगी प्रवासी बसला लागलेल्या आगीत दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना जयपूर दिल्ली महामार्गावर गुरुग्रामच्या सिग्नेचर टॉवरजवळ बुधवारी रात्री घडली. या बसमधील 10 ते 12 प्रवासी गंभीर असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच गुरुग्राम पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे.
-
#WATCH | Haryana: Latest visuals from the Delhi-Jaipur expressway in Gurugram where two people died after a bus was gutted in the fire. https://t.co/MlZZFKJwTj pic.twitter.com/guNWS72CKz
— ANI (@ANI) November 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Haryana: Latest visuals from the Delhi-Jaipur expressway in Gurugram where two people died after a bus was gutted in the fire. https://t.co/MlZZFKJwTj pic.twitter.com/guNWS72CKz
— ANI (@ANI) November 8, 2023#WATCH | Haryana: Latest visuals from the Delhi-Jaipur expressway in Gurugram where two people died after a bus was gutted in the fire. https://t.co/MlZZFKJwTj pic.twitter.com/guNWS72CKz
— ANI (@ANI) November 8, 2023
आगीत बस जळून खाक : जयपूर दिल्ली महामार्गावर बुधवारी रात्री एक खासगी प्रवासी गुरुग्राममधील सिग्नेचर टॉवरजवळ असलेल्या उड्डाणपुलावर पोहोचली असता, बसला आग लागली. या बसमध्ये तब्बल 40 प्रवासी प्रवास करत होते. आगीची माहिती मिळताच प्रवाशांना बसमधून खाली उतरवण्यासाठी धावपळ झाली. मात्र आगीनं रौद्ररुप धारण केल्यामुळे प्रवाशांना तत्काळ खाली उतरता आलं नाही. त्यामुळे 10 ते 12 प्रवासी गंभीर झाले, तर दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल होईपर्यंत ही प्रवासी बस जळून खाक झाली होती.
आगीचं कारण गुलदस्त्यात : जयपूर दिल्ली महामार्गावर गुरुग्राममध्ये ही घटना घडली आहे. या अपघातामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आग लागल्यानंतर प्रवाशांना बसच्या बाहेर काढण्यात येत होते. मात्र आगीनं क्षणातच भीषण रुप धारण केलं. त्यामुळे बस धुराच्या लोटात वेढली गेली. त्यामुळे दोन प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात 10 ते 12 प्रवासी गंभीर झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. गुरुग्राम पोलीस या आगीचा तपास करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :