ETV Bharat / bharat

दत्तक पुत्राच्या लग्नात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची उपस्थिती

गेली पाच दशके राजकारणात सक्रिय असणाऱ्या राजनाथ सिंह यांच्या स्नेहशील व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू समोर आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी एका दलित तरुणाच्या शिक्षणाचा खर्च उचलला होता. आता त्या तरुणाच्या लग्नात त्यांनी अनपेक्षितपणे उपस्थिती लावल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

राजनाथ सिंह यांचा दत्तक पूत्र
राजनाथ सिंह यांचा दत्तक पूत्र
author img

By

Published : Feb 28, 2021, 7:30 PM IST

गाजीपूर - देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे इतर नेत्यांसोबतचे सौहार्द आणि मैत्र पक्षबंधनांच्या पलीकडे आहेत. गेली पाच दशके राजकारणात सक्रिय असणाऱ्या राजनाथ सिंह यांच्या स्नेहशील व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू समोर आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी एका दलित तरुणाच्या शिक्षणाचा खर्च उचलला होता. आता त्या तरुणाच्या लग्नात त्यांनी अनपेक्षितपणे उपस्थिती लावल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

दत्तक पुत्राच्या लग्नात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची उपस्थिती

राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पद सांभाळले होते. तेव्हा जवळपास 20 वर्षांपूर्वी त्यांनी एका तरुणाच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्याच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली होती. बिजेंद्र असे त्या तरुणाचे नाव आहे. बिजेंद्र तरुणाचे शनिवारी लग्न होते. या लग्नात अनपेक्षितपणे उपस्थिती दर्शवत त्यांनी वधू-वराला आशिर्वाद दिले. बिजेंद्रने डॉक्टरकीचे शिक्षण घेतले. सध्या तो फैजाबादमधील गोसाईगंज सीएचसीमध्ये एमओ म्हणून तैनात आहे.

शेतकऱ्यांचा राजनाथ सिंह यांच्यावर विश्वास -

मागील काही दिवसांपासून तीन कृषी विधेयकांविरोधात देशात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्राने प्रतिनिधी म्हणून राजनाथ सिंह यांना शेतकऱ्यांशी बोलण्याचे स्वातंत्र्य द्यावे. तर तोडगा निघेल, असा विश्वास शेतकरी नेत्यांनी व्यक्त केला आहे.

सरकारमध्ये संरक्षणमंत्री -

राजनाथ सिंह हे सध्याच्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री आहेत. भारतीय जनता पक्षाचे दोनवेळा अध्यक्ष व उत्तर प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले राजनाथ सिंह भाजपामधील सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी एक मानले जातात. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी लखनौ मतदारसंघामधून विजय मिळवला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.