ETV Bharat / bharat

चंबळमध्ये बंडखोरीच्या इतिहासाची पुनरावृत्ती!

ईटीव्ही भारतचे रीजनल एडिटर रुपेश श्रोत्री यांनी मध्य प्रदेशच्या पोटनिवडणुकीच्या निकालाचे केलेले विश्लेषण... चंबळच्या लोकांचे बंडखोरीशी वेगळेच नाते राहिले आहे. चंबळमधून ज्याने कोणी बंडखोरी केली, त्याला कायम लोकांनी समर्थन दिले आहे. मात्र, चंबळमधील लोकांच्या रक्तात असलेल्या बंडखोरीचा फटका यावेळी बंडखोरांनाही बसला...

Special story of Mutiny of Chambal in MP by poll result
चंबळमध्ये बंडखोरीच्या इतिहासाची पुनरावृत्ती!
author img

By

Published : Nov 12, 2020, 2:45 PM IST

Updated : Nov 12, 2020, 4:31 PM IST

चंबळच्या राजकारणामध्ये इतिहासात जे काही घडले, त्यामध्ये कायम दिल्लीचा हात राहिला आहे. कित्येक वर्षांपूर्वी दिल्लीमधील तोमर काळाचा अंत झाला होता. तोमर वंशातील लोकांनी खोऱ्यामध्ये आसरा घेत आपला जीव वाचवला. त्याचवेळी धौलपूरच्या सामंतालाही मालवाच्या शासकांनी पदच्युत केले होते. अशात, धौलपूरच्या राजकुमाराने बंडखोरी केली. आपल्या अधिकारांसाठी त्याने चंबळमध्ये आसरा घेतला. तेथील लोकांनी त्याला आपल्या अधिकारांसाठीच्या लढाईमध्ये पूर्णपणे सहकार्य केले. इथूनच चंबळचे बंडखोरीशी नाते जोडले गेले, असे म्हणतात.

'महालात' राहणाऱ्यांनी यापूर्वी कधीही बंडखोरीचे समर्थन केले नव्हते. उलट बंडखोरी करणाऱ्यांचे दमन कशाप्रकारे करता येईल याकडेच या महालातील लोकांचा कल राहिला आहे. मात्र, आताच्या काळात महालात राहणाऱ्या लोकांनीही बंडखोरी स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. अशीच बंडखोरी दाखवत ज्योतिरादित्य सिंधियांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. अखेर, तेही चंबळमध्येच वाढलेले आहेत. यावेळीही बंडखोरीचे कारण 'दिल्ली' मधील काँग्रेस ठरले. सिंधिया जेव्हा भाजपमध्ये आले, तेव्हा एकूण २२ आमदारांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. यामधील १९ आमदार सिंधियांच्या गटातील होते.

चंबळच्या लोकांनी इतिहासात तर राजकुमाराला पाठिंबा दिला होता. मात्र, यावेळी बंडखोरी करणाऱ्याच्यामागे चंबळचे लोक उभे राहतील का? हा प्रश्न निवडणुकांच्या निकालापूर्वी सर्वांनाच पडला होता. त्यातच प्रचाराला आलेल्या कमलनाथांनी सिंधियांच्या बंडखोरीला 'गद्दारी' म्हणत, चंबळच्या लोकांना त्यांचा पाठिंबा न देण्याचे आवाहन केले होते. मात्र, कमलनाथ चंबळच्या लोकांना ओळखायला चुकले, असंच निकालानंतर म्हणायला हवं. कारण, चंबळच्या लोकांनी पुन्हा एकदा बंडखोरी करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. सिंधियांना समर्थन देणाऱ्या १९ पैकी १३ आमदार पुन्हा निवडून आले आहेत. बंडखोरी केलेल्या एकूण १५ जागांपैकी काँग्रेसला सातच जागा मिळाल्या आहेत. तर, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आठ आमदारांना या निवडणुकीत विजय मिळाला आहे.

या आमदारांची बंडखोरी जनतेला मान्य..

काँग्रेसशी बंडखोरी करुन, भाजपच्या तिकीटावर ग्वाल्हेर मतदारसंघातून उभे असणाऱ्या प्रद्युम्न सिंह यांना लोकांनी विजयी केले आहे. तसेच, अंबाह मतदारसंघातून कमलेश जाटव सुमारे १४ हजार मताधिक्याने निवडून आले. भांडेरमध्ये रक्षा सिरोनिया यांना १६१ मतांनी निसटता विजय मिळाला. तर, मेहगांवमधून ओपीएस भदौरिया यांना विजय मिळाला. पोहरी मतदारसंघातून सुरेश धाकडे हे २२ हजार मतांनी निवडणून आले. याठिकाणी काँग्रेस तिसऱ्या स्थानी पोहोचली. तर मुंगावली मतदारसंघातून बृजेंद्र सिंह यादव निवडून आले. हा त्यांचा सलग तिसरा विजय होता.

बमोरी मतदारसंघातून निवडून आलेल्या महेन्द्र सिंह सिसोदिया यांना तब्बल ५३ हजार मताधिक्य मिळाले. यापूर्वी ते काँग्रेसमधून निवडून आले होते, तेव्हा त्यांना केवळ २७ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. म्हणजेच, लोकांनी त्यांना भाजपमध्ये असताना जास्त पाठिंबा दिला. तर, अशोकनगर मतदारसंघातून जजपाल सिंह यांना लोकांनी निवडून दिले. मागील वेळी त्यांनी भाजपला सत्तेत येण्यापासून रोखले होते. तर यावेळी भाजपकडून उभे राहत त्यांनी काँग्रेसचा पत्ता साफ केला आहे.

या आमदारांची बंडखोरी ठरली अमान्य..

बंडखोरी करुन निवडणूक हरलेल्यांमध्ये सर्वात पहिले नाव येते ते इमरती देवींचे. कमलनाथ यांच्या आक्षेपार्ह टिप्पणीचा फायदा त्यांना होईल असे सर्वांना वाटले होते, मात्र तसे झाले नाही. डबरामधून इमरती देवी तीन वेळा निवडून आल्या आहेत. मात्र, त्यांना तीन वेळा काँग्रेसमुळे विजय प्राप्त झाला आहे हे कदाचित त्या विसरल्या असाव्यात. कारण, यावेळी डबराच्या लोकांनी इमरती देवींना नाही, तर काँग्रेस उमेदवार सुरेश राजे यांच्या बाजूने आपला कल दिला. करैरा मतदारसंघातून जसमंत जाटव यांनाही लोकांनी स्वीकारले नाही.

पूर्व ग्वाल्हेर मतदारसंघातून मुन्ना लाल गोयल यांचा पराभव झाला. तब्बल आठ हजार मतांनी काँग्रेस उमेदवाराने त्यांना हरवले. हा सिंधियांसाठी मोठा धक्का होता, कारण याच मतदारसंघामध्ये त्यांचा राजमहाल आहे. दिमनी मतदारसंघातील लोकांनी यावेळीही काँग्रेस उमेदवाराला बहुमत देत बंडखोरी अमान्य केली. याठिकाणी भाजपकडून उभे असलेले दंडोतिया मंत्री असूनही निवडणूक हरले. सुमावलीमधून एदल सिंह कंषाना यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.

मुरैनातील लोकांची वेगळीच बंडखोरी..

मुरैना मतदारसंघातील लोकांनी आपल्याच आमदाराशी बंडखोरी केली. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचा हा मतदारसंघ. इथे सिंधिया यांचाही मोठ्या प्रमाणात प्रभाव असल्याचे दिसून येते. मात्र यंदा मतदारांनी या दोघांच्याही हातावर तुरी देत, काँग्रेसच्या राकेश मावई यांना विजयी केले. पाच हजारांच्या मताधिक्याने ते निवडून आले. याठिकाणी प्रचारसभांना शिवराज सिंह यांच्यासोबत तोमरही होते. मात्र, जनतेने आपल्या रक्तात बंडखोरी असल्याचे सिद्ध केले. बंडखोरीची झळ कशी असते, हे मुरैनाच्या लोकांनी सिंधिया आणि तोमर या दोघांनाही दाखवून दिले!

हेही वाचा : 'कुटुंब केंद्रीत असलेले पक्ष लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका'

Last Updated : Nov 12, 2020, 4:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.