ETV Bharat / bharat

Defamation Case Against Kejriwal: अरविंद केजरीवाल विरुद्ध गुजरात विद्यापीठाकडून मानहानीचा खटला दाखल - गुजरात विद्यापीठ मानहानी दावा

गुजरात विद्यापीठाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी जयेशभाई चौटिया यांनी आम आदमी पक्षाच्या दोन नेत्यांना २३ मे रोजी समन्स बजावले आहे.

Defamation Case Against Kejriwal
अरविंद केजरीवाल
author img

By

Published : Apr 16, 2023, 10:48 PM IST

Updated : Apr 16, 2023, 10:55 PM IST

अहमदाबाद (गुजरात): मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात विद्यापीठाने पंतप्रधान मोदींची पदवी मागितल्याप्रकरणी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात अहमदाबाद न्यायालयाने अरविंद केजरीवाल आणि आप नेते संजय सिंह यांच्याविरोधात समन्स जारी केले आहेत. अहमदाबादच्या फौजदारी न्यायालयाने एका याचिकेवर दोन्ही नेत्यांविरोधात हे समन्स बजावले आहे. विद्यापीठाच्या सरचिटणीसांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. याचिकेत म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे गुजरात विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला तडा गेला आहे.

गुजरात विद्यापीठावर प्रश्नचिन्ह: याचिकाकर्त्यांचे वकील अमित नायर म्हणाले की, 31 मार्च रोजी गुजरात उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीशी संबंधित कागदपत्रे देऊ नयेत, असा आदेश दिला. यानंतर, 1 एप्रिल रोजी अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा पंतप्रधान मोदी आणि गुजरात विद्यापीठाबद्दल ट्विटर तसेच इतर माध्यमांवर चर्चा केली आणि दुसऱ्या दिवशीही त्यांनी गुजरात विद्यापीठावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींची कागदपत्रे यापूर्वीच गुजरात विद्यापीठाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहेत.

संजय सिंह, केजरीवाल हाजीर हो: दोन्ही नेत्यांना याची आधीच माहिती होती; मात्र तरीही त्यांनी अशा प्रकारे चिथावणी देण्याचा प्रयत्न केला, असे याचिकेत म्हटले आहे. गुजरात विद्यापीठाचे डॉ. पियुष पटेल यांनी १२ एप्रिल रोजी न्यायालयात ही तक्रार केली होती. त्याची पडताळणी त्यादिवशी न्यायालयाने केली आणि पंतप्रधांची शैक्षणिक कागदपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने गुन्हा दाखल करावा, असे पटेल म्हणाले. आता 23 मे रोजी संजय सिंह आणि अरविंद केजरीवाल यांना न्यायालयात हजर राहायचे आहे.

केजरीवालांना दंड : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुजरात राज्याच्या विधी सेवा विभागाने दंडाची रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले होते. विशेष म्हणजे, गुजरात उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीबाबत सीआयसीचा आदेश रद्द केला होता. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ठोठावण्यात आलेल्या २५ हजारांचा दंडाची रक्कम गुजरात राज्याच्या राज्य विधी सेवा विभागात जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले.

हेही वाचा: Vajramuth Sabha : उलट्या पायाच्या सरकारमुळे राज्यात अवकाळी; उद्धव ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर जोरदार टीका

Last Updated : Apr 16, 2023, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.