बंगळुरू - कोरोनाच्या काळात आर्थिक समस्यांना अनेकजण सामोरे जात आहेत. अशातच कर्जबाजारीपणाला कंटाळून एकाच कुटुंबातील सहा जणांनी तलावात उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना यादगिरी जिल्ह्यातील शहरापूर तालुक्यात डोरानहळ्ळी येथे घटना घडली आहे.
भीमार्या सुरपुरा (४५) व त्यांची पत्नी शांताम्मा (३६), मुले सुमित्री (१२), लक्ष्मी आणि शिवराज अशी मृतांची नावे आहेत. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. तलावातून चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हे कुटुंब कर्जाच्या अडचणींना सामोरे जात होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा-मॉर्डना लस भारतात लवकरच होणार दाखल; केंद्राने सिप्लाला आयातीची दिली परवानगी
कोरोनाच्या भीतीने आंध्र प्रदेशमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची आत्महत्या
कोरोनाच्या भीतीने आंध्र प्रदेशमध्ये एकाच परिवारातील चौघांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब २३ जूनला समोर आली होती. ही घटना आंध्र प्रदेशच्या कुरनूल वड्डेगेरी परिसरात घडली आहे. मृतांच्या घरात एक सुसाईट नोट मिळाली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहलं आहे की, त्यांच्या जवळच्या नातेवाईक आणि मित्राचे कोरोनामुळे निधन झाले. यामुळे आम्ही तणावात होतो. आम्हाला देखील कोरोना होईल अशी भीती आम्हाला होती.
हेही वाचा-भाजपचे नेते हरिश्चंद्राचे अवतार आहेत का? - संजय राऊत