ETV Bharat / bharat

Death threat to Kaali Director : 'काली'च्या दिग्दर्शिकेला जीवे मारण्याची धमकी.. उजव्या विचारसरणीची महिला नेता अटकेत - कालीच्या दिग्दर्शिका लीना मनिमेकलाई

काली या माहितीपटाच्या पोस्टरवरून वाद निर्माण झाल्यानंतर कालीच्या दिग्दर्शिका लीना मनिमेकलाई ( Kaali director Leena Manimekalai ) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली ( Death threat to Kaali Director ) आहे. याप्रकरणी पोलिसांनी षष्टी सेना हिंदू पीपल्स मुव्हमेंटच्या महिला नेत्या सरस्वती यांना अटक केली आहे.

Death threat to Kaali Director
'काली'च्या दिग्दर्शिकेला जीवे मारण्याची धमकी
author img

By

Published : Jul 6, 2022, 1:34 PM IST

कोईम्बतूर ( तामिळनाडू ) : दिग्दर्शिका लीना मनिमेकलाई ( Kaali director Leena Manimekalai ) यांच्या 'काली' या माहितीपटाच्या पोस्टरने मोठा वाद निर्माण केला असून, त्या पोस्टरमध्ये देवी धूम्रपान करताना दिसत आहे. विविध हिंदू संघटना याचा निषेध करत आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश पोलिसांनी दिग्दर्शिका लीना मनिमेकलाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडीओ केला व्हायरल : याचप्रकरणी कोईम्बतूर षष्टी सेना हिंदू पीपल्स मूव्हमेंटच्या महिला नेत्या सरस्वती यांनी या पोस्टरचा निषेध केला आणि लीना मणिमेकलाई यांना जीवे मारण्याची धमकी ( Death threat to Kaali Director ) दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पसरला आहे. त्यामुळे पोलिसांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली सरस्वतीविरुद्ध सेल्वापुरम पोलिस ठाण्यात दोन कलमांखाली गुन्हे दाखल करून सरस्वतीला अटक केली आहे.

पोस्टर झाले व्हायरल : चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांनी त्यांच्या ‘काली’ या माहितीपटाचे पोस्टर ट्विट केले आहे. हे पोस्टर ट्विट होताच व्हायरल झाले. लोक चित्रपट निर्मात्यावर आणि पोस्टरवर सतत टीका करत आहेत आणि त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. याबाबत गो महासभेचे अध्यक्ष अजय गौतम यांनी दिल्ली आयुक्त आणि गृह मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यामुळे चित्रपट निर्मात्या लीना यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा. असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यासोबतच पोस्टर्स आणि चित्रपटांच्या प्रदर्शनावरही बंदी घालावी अशी मागणीही केली आहे.

गुन्हाही दाखल : उत्तर प्रदेशात चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांच्या काली या माहितीपटाच्या पोस्टरला विरोध होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टरमध्ये काली माँ सिगारेट ओढताना दाखवण्यात आली आहे. या संदर्भात लखनौमधील हजरतगंज पोलीस ठाण्यात चित्रपट निर्मात्यासह ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर कोर्टातही यासंदर्भात केस दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा : Controversy Over Kaali Documentary : काली मातेला सिगारेट पिताना दाखवणे आक्षेपार्ह.. 'काली'वर बंदी घालणार : मंत्री नरोत्तम मिश्रा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.