ETV Bharat / bharat

Kerala Crime News : धक्कादायक! केरळमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू

केरळमधील कन्नूर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सध्या याला सामूहिक आत्महत्या म्हटले जात आहे. पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

DEATH OF FIVE FAMILY MEMBERS IN KERALA
केरळमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
author img

By

Published : May 24, 2023, 8:36 PM IST

कन्नूर (केरळ) : केरळच्या कन्नूर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही सामूहिक आत्महत्या आहे की हत्येचे प्रकरण आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याचा अंदाज : कन्नूर जिल्ह्यातील चेरुवाथूर येथील रहिवासी असलेल्या श्रीजा, तिचा दुसरा पती शाजी आणि त्यांची मुले सूरज (12), सुजीन (8) आणि सुरभी (6) यांचा मृत्यू झाला आहे. म्हटले जात आहे की, घरातील महिलेने दुसरे लग्न केले, त्यानंतर कुटुंबात कलह सुरू झाला होता. ही तिन्ही श्रीजाच्या पहिल्या पतीची मुले होती. मुलांची हत्या करून दोघांनीही आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

पोलीस ठाण्यात फोन करून केली आत्महत्या : डीएसपी केई प्रेमचंद्रन यांनी सांगितले की, आज सकाळी 6 वाजता श्रीजाला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. तिच्या कुटुंबात काही समस्या होत्या. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या दुसऱ्या लग्नानंतर हा वाद वाढला होता. त्यामुळे दोघांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. मात्र आज सकाळी श्रीजाने पोलीस ठाण्यात फोन करून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डीएसपी केई प्रेमचंद्रन यांनी सांगितले. डीएसपी म्हणाले की, शवविच्छेदन प्रक्रियेनंतरच मुलांची हत्या झाली की नाही हे समजेल.

कुटुंबातील कलह मृत्यूचे कारण : दुसऱ्या लग्नानंतर घरात दररोज वाद व्हायचे. मात्र हे ती हे जीवघेणे पाऊल उचलेल, असे स्थानिकांना वाटले नव्हते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. चेरुवथूर येथील मूळ रहिवासी असलेल्या श्रीजा तिच्या माजी पती सुनीलच्या नावी असलेल्या जागेवर राहत होती. शाजी आधीच विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. दोघांनी घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, परस्पर वाद हे मृत्यूचे कारण असू शकते. शाजीच्या घरच्यांनीही शाजीसोबतच्या तिच्या नात्याला आणि लग्नाला विरोध केला होता.

हेही वाचा :

  1. Nashik Crime : धक्कादायक! वाढदिवसानिमित्ताने अल्पवयीन मैत्रिणीला घरी बोलावले अन् केला बलात्कार
  2. Nagpur Crime : लेकीने घडवला बापाचा खून, बापाचे ते प्रकरण मुलीच्या डोक्यात गेलं मग थेट दिली हत्येची सुपारी
  3. Rape On Teacher : घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत नराधमाचा शिक्षिकेवर अत्याचार, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.