ETV Bharat / bharat

Raipur Coal Ash Digging: कोळशाची राख खोदताना 5 जण गाडले, 3 ठार.. वाचा कसा घडला अपघात - Death in coal ash digging

छत्तीसगडच्या रायपूरच्या सिलतारा येथे राखेचे उत्खनन सुरू असताना दुर्घटना होऊन अनेक लोक गाडले गेले. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 3 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

Death in coal ash digging in Raipur
कोळशाची राख खोदताना 5 जण गाडले, 3 ठार.. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये घडली घटना
author img

By

Published : Jan 31, 2023, 7:22 PM IST

रायपूर (छत्तीसगड) : छत्तीसगडची राजधानी रायपूरला लागून असलेल्या सिलतारा या औद्योगिक परिसरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात एका पुरुषासह 2 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर एका अल्पवयीनासह एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कोळशाच्या राखेत गाडलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आणि जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले.

राखेचे उत्खनन करताना अपघात : राजधानी रायपूर जिल्ह्याचे औद्योगिक क्षेत्र असलेल्या सिलतारा चौकीची ही घटना आहे. जिथे काही ग्रामस्थ राखेच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. शेजारी राहणारे गावकरी कंपनीने काढलेल्या ढिगाऱ्यातून राख बाजूला काढत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात कोळसाही शिल्लक राहतो. ज्याचा उपयोग गावकरी शेगडी पेटवण्यासाठी करतात. त्याच्या खोदकामासाठी ग्रामस्थ पोहोचले होते. यावेळी कोळशाच्या राखेचा बोगदा बराच लांब झाला होता. आत जाण्याचा भाग कोसळल्याने बाहेर पडण्याचा रस्ताच बंद झाला. त्यामुळे ते अचानक बोगद्यात अडकले आणि 5 लोक त्यात गाडले गेले. ज्यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे. दोघांवर उपचार सुरू आहेत.

काय म्हणतात अधिकारी : धारसिवान पोलिस स्टेशनचे अधिकारी शिवेंद्र सिंह राजपूत यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. सर्वांना रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. एका अल्पवयीनासह 1 तरुण जखमी झाला आहे. मंगळवारचा दिवस अपघातांनी भरलेला होता. पेंद्रातही एका तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तरुणाची आई आणि मावशीलाही विजेचा धक्का बसला. घराच्या अंगणात कपडे सुकवत असताना हा अपघात झाला.

एकीकडे ही घटना घडली असतााच पेंद्री येथे जिल्ह्यातील कोटमी बाजार परिसरात घरात कपडे सुकवताना तीन जणांचा विजेचा झटका बसून मृत्यू झाला. या अपघातात नितीन गुप्ता या १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर त्याची आई ममता गुप्ता आणि मावशी रत्ना गुप्ता या गंभीर भाजल्या आहेत. त्यांना गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर घरातील लोक आणि आजूबाजूच्या लोकांनी तिघांनाही गोरेला येथील जिल्हा रुग्णालयात नेले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासादरम्यान नितीन गुप्ता यांना मृत घोषित केले. अन्य दोन महिलांची प्रकृती चिंताजनक आहे.

हेही वाचा: ED raid in Chhattisgarh कोण आहे कोळसा व्यापारी सूर्यकांत तिवारी का पडलाय त्यांच्यावर ईडीचा छापा महाराष्ट्राशी संबंध

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.