नवी दिल्ली - दिल्लीमध्ये कोरोनाच्या लाटेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबासाठी केजरीवाल सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. याबाबतच्या घोषणांची अधिसूचना दिल्ली सरकारने काढली आहे. या योजनेला 'मुख्यमंत्री कोविड-१९ परिवार आर्थिक सुरक्षा योजना' हे नाव देण्यात आले आहे.
दिल्ली सरकारच्या समाज कल्याण विभागाने काढलेल्या अधिसूचनेनुसार दिल्लीमधील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मृत्यू झालेल्या नागरिकाच्या कुटुंबाला ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. तर दुसरीकडे दिल्ली सरकारकडून अशा कुटुंबातील सदस्याला नागरी सुरक्षा विभागात नोकरी देण्यावरची विचार करण्यात येत आहे.
हेही वाचा-विजय मल्ल्यासह नीरव मोदीला ईडीचा दणका; ९३७३ कोटी रुपयांची मालमत्ता बँकांकडे वर्ग
मुलांना २५ व्या वर्षापर्यंत प्रति महिने २५०० रुपये दिले जाणार-
अधिसूचनेनुसार कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झालेल्या मुलांना मोफत शिक्षण आणि आर्थिक मदतही केली जाणार आहे. अशा मुलांना दिल्ली सरकारकडून वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत प्रति महिने २५०० रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे. तसेच या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही दिल्ली सरकारही उचलणार आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरणार 'डेल्टा व्हेरीएन्ट'? रत्नागिरी, जळगावात सर्वाधिक रुग्ण
दिल्लीचा नागरिक असलेल्या कुटुंबालाच मिळणार मदत
घरातील कर्त्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मासिक २५०० रुपयाची मदत केली जाणार आहे. मात्र, ही योजना केवळ दिल्लीच्या नागरिकांसाठी आहे.