ETV Bharat / bharat

Death anniversary of Sant Gadge Baba : माणसातली माणुसकी जपणारे समाज सुधारक संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी

विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव संत गाडगे बाबा (Sant Gadge Baba) यांचे आहे. समाज सुधारक गाडगे बाबा (social reformer Sant Gadge Baba) यांचे अमरावती येथे 20 डिसेंबर 1956 रोजी देहावसान (Death anniversary of Sant Gadge Baba) झाले. यानिमित्ताने जाणुन घेऊया त्यांच्या थोर विचारांचा आढावा.

Death anniversary of Sant Gadge Baba
संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी
author img

By

Published : Dec 17, 2022, 1:17 PM IST

Updated : Dec 20, 2022, 7:30 AM IST

संत गाडगे बाबा (Sant Gadge Baba) म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार (Sant Gadge Baba Maharashtra kirtankar), संत आणि समाजसुधारक (social reformer Sant Gadge Baba) होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब राहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. 20 डिसेंबर मंगळवार रोजी त्यांची पुण्यतिथी (Death anniversary of Sant Gadge Baba) आहे.

महत्वाची त्रिसुत्री : संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर, तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत.

देव देवळात नाही, माणसात शोधा : गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. 'तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |' असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. 'देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका', अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.

कीर्तनातून केले समुपदेशन : समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका, असे ते आपल्या कीर्तनातून सांगत.

संत तुकाराम महाराजांना मानले गुरु : देव दगडात नसून तो माणसांत आहे, हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.

संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश : भुकेलेल्यांना - अन्न, तहानलेल्यांना - पाणी, उघड्यानागड्यांना - वस्त्र, गरीब मुलामुलींना - शिक्षणासाठी मदत, बेघरांना - आसरा, अंध, पंगू रोगी यांना - औषधोपचार, बेकारांना - रोजगार, पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना - अभय, गरीब तरुण-तरुणींचे - लग्न, दुःखी व निराशांना - हिंमत, गोरगरिबांना - शिक्षण, या दशसूत्रीवर आपले संपुर्ण आयुष्य गाडगेबाबा यांनी लोकांसाठी वाहुन दिले.

Last Updated : Dec 20, 2022, 7:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.