पाटणा- गंगा नदीमध्ये मृतदेह आढळण्याचे सत्र सुरू आहे. उत्तर प्रदेशमधील बल्लिया जिल्ह्यातील नरहरी ठाण्याजवळ सुहाव ब्लॉक अंतर्गत ६० जवळी डेरा गंगा घाटजवळ जवळपास १२ मृतदेह आढळले आहेत. याबाबत उत्तर प्रदेशमधील प्रशासन अनभिज्ञ आहे.
मृतदेहांची अवहेलना होत असल्याचे आढळून येत आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथील नदीतही मृतदेह आढळले होते. बिहारच्या बक्सरमधून एक धक्कादायक घटना १० मे रोजी समोर आली होती.
हेही वाचा-पोलिसांची 'हार्ट पेशंटला' अमानुष मारहाण; घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..
शहरातून वाहणाऱ्या गंगा नदीच्या किनारी जवळपास ५० लोकांचे मृतदेह वाहून आल्याचे आढळून आले होते यांपैकी कित्येक मृतदेहांचे भटक्या कुत्र्यांनी लचकेही तोडल्याचे दिसून येत आहे. कोरोना काळामध्ये घरातच मृत्यू झालेल्या आणि अंत्यसंस्कार होऊ न शकलेल्या मृतदेहांना नातेवाईकांनी गंगेत फेकले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देताच, त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा-तेलंगाणामध्ये १२ मेपासून १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर