नवी दिल्ली - तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वादळाला सामोरे जाण्यासाठी संबंधित राज्ये आणि केंद्रीय मंत्रालय व संस्थांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली.
कॅबिनेट सचिव हे किनारपट्टीतील राज्ये आणि केंद्रीय मंत्रालयं हे संबंधित यंत्रणांच्या मुख्य सचिवांशी सतत संपर्कात राहातील. केंद्रीय गृहमंत्रालय 24 तास परिस्थितीचा आढावा घेत असून, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश आणि संबंधित संस्थांच्या संपर्कात आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.