ETV Bharat / bharat

तामिळनाडूला मिचॉन्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा, जनजीवन विस्कळीत - तामिळनाडूला मिचॉन्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा

Cyclone Michaung update : तामिळनाडूत मिचॉन्ग चक्रीवादळानं हाहाकार उडाला आहे. सध्या पावसाचा जोर ओसरला असला, तरी अजूनही जनजीवन पूर्ववत झालेलं नाही.

Cyclone Michaung update
मिचॉन्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 3:21 PM IST

चेन्नई Cyclone Michaung update : तामिळनाडूला मिचॉन्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. यामुळे तामिळनाडूतील जनजीवन विस्कळीत झालंय. चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू या जिल्ह्यात रविवारी जोरदार पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. अनेक ठिकाणी सामान्य नागरिक अडकून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

तामिळनाडूला मुसळधार पावसाचा तडाखा : मिचॉन्ग चक्रीवादळामुळे तामिळनाडूत मुसळधार पावसानं हजेरी लावली. राज्यातील चेंबरमबक्कम, पुझल आणि पुंडी या नद्यांचं पाणी ओव्हरफ्लो झालं आहे. तामिळनाडू राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (TNSDMA) आणि इतर बचाव पथकानं बचावकार्य सुरू केलंय. सोमवारी जोरदार पावसामुळे चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे जलमय झालं होतं. यामुळे सुमारे ७० हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली होती.

चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत : तामिळनाडूत सोमवारी मध्यरात्रीपासून मेट्रो शहरांसह ग्रामीण भागात पावसानं हाहाकार उडाला होता. मात्र आता पावसाचा जोर हळूहळू कमी होत आहे. तरीही जनजीवन पूर्वपदावर आलं नाही. त्यामुळे तामिळनाडूत बस आणि चेन्नई लोकलसह उपनगरीय इलेक्ट्रिक ट्रेन्सची वाहतूक बंद आहे. मेट्रो रेल्वेसेवा मंगळवारी पहाटे ५ वाजल्यापासून सुरू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे तब्बल ५ हजारपेक्षा अधिक कामगार चेन्नईला हलवण्यात आले असून ८ हजार वीज कर्मचारी वीज पूर्ववत करण्यासाठी तैनात करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अमित शाह यांनी घेतला आढावा : गृहमंत्री अमित शाह यांनी मिचॉन्ग चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यांनी तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. शाह यांनी या राज्यांना सर्व आवश्यक मदतीचं आश्वासन दिलं आहे. याशिवाय राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या जवानांची तैनाती करण्यात आली असून मदतीसाठी आणखी अतिरिक्त पथकं तयार असल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. दक्षिण भारताला बसणार 'मिचॉन्ग' चक्रीवादळाचा तडाखा; सरकार अलर्टवर, NDRF तैनात
  2. Cyclone Biperjoy: मुंबईच्या समुद्रातून उसळू लागल्या उंच लाटा; सर्व चौपाट्यांवर सुरक्षा रक्षक तैनात
  3. मिचॉन्ग चक्रीवादळाचा थेट परिणाम विदर्भावर जाणवणार; वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना होण्याचा अंदाज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.