ETV Bharat / bharat

CWG 2022 : अविनाश साबळेने स्टीपलचेसमध्ये जिंकले रौप्यपदक - Commonwealth Games 2022 india

राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये अविनाश साबळेने आज भारताला दुसरे रौप्यपदक ( Avinash Sable won silver medal ) मिळवून दिले. त्याने 3 हजार मीटर स्टीपलचेसमध्ये चमकदार कामगिरी केली.

Avinash Sable
अविनाश साबळे
author img

By

Published : Aug 6, 2022, 5:50 PM IST

बर्मिंगहॅम: राष्ट्रकुल क्रीडा 2022 ( CWG 2022 )स्पर्धेचा आज नववा दिवस आहे. तरी देखील भारतीय खेळाडूंची पदकांची घोडदौड कायम आहे. अविनाश साबळेने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्य पदक जिंकले ( Avinash Sable won silver medal in steeplechase ) आहे. अविनाशने 8.11.20 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. यासह त्याने तीन हजार मीटर शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम केला.

तो सुवर्णपदक विजेता अब्राहम किबिव्होटपेक्षा ( Gold medalist Abraham Kibivot ) फक्त 0.5 सेकंद मागे होता. केनिया अब्राहमने 8.11.15 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. त्याचवेळी केनियाच्या अमोस सेरेमने 8.16.83 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण करून कांस्यपदक पटकावले.

भारताचे पदक विजेते खेळाडू -

9 सुवर्ण: मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॉवर लिफ्टिंग), बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया

10 रौप्य: संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशु मलिक, प्रियांका, अविनाश साबळे.

9 कांस्य: गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरव घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल.

हेही वाचा - Chess Olympiad 2022 : भारताच्या महिला बुद्धिबळ संघाने नोंदवला सलग सातवा विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.