ETV Bharat / bharat

Cruelty With Man: औषधापेक्षा इलाज भयंकर, व्यसनमुक्ती केंद्रात तरुणाच्या गुप्तांगात टाकलं लायटर! - संजय गांधी रुग्णालय

Cruelty With Man: मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आलं आहे. रेवा येथील संकल्प व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांनी एका तरुणाच्या गुप्तांगात गॅस लायटर घातला. त्यामुळे त्याच्या आतड्या फाटल्या आहेत. या घटनेनंतर पीडित तरुणाच्या कुटुंबीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Cruelty With Man
सनमुक्ती केंद्रात क्रूरतेचे कळंस, तरुणाच्या गुप्तांगात टाकले लायटर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 9:55 AM IST

व्यसनमुक्ती केंद्रात क्रूरतेचा कळंस, तरुणाच्या गुप्तांगात टाकले लायटर

रीवा Cruelty With Man : मध्यप्रदेशातील रीवा विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संकल्प व्यसनमुक्ती केंद्रातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यसनमुक्ती केंद्रातील संचालक आणि कर्मचाऱ्यांनी क्रुरपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. एका तरुणाच्या गुप्तांगत गॅस लायटर टाकून त्याला गंभीर जखमी केले. त्यामुळं त्याचे आतडेही फाटले. त्यानंतर पीडित तरुणाच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागल्याने नशामुक्त केंद्राचे संचालक आणि कर्मचारी घाबरले. त्यांनी घाईघाईनं त्याला संजय गांधी रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान, घरच्यांना ही बाब कळताच संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे.

संकल्प व्यसनमुक्ती केंद्रात तरुणावर अत्याचार : गढवा येथील रहिवासी करण (नाव बदलले आहे) हा व्यसन करायचा. व्यसनमुक्तीसाठी त्याच्या कुटुंबीयांनी त्याला 25 जुलै 2021 रोजी संकल्प व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलं होतं. व्यसनमुक्ती केंद्र संचालक करणच्या कुटुंबीयांकडून महिन्याला 15 ते 18 हजार रुपये वसूल करायचे. मात्र, पीडित करणची पत्नी जेव्हा त्याला भेटायला गेली तेव्हा तिला पतीला भेटण्यापासून रोखले.

पीडित तरुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर प्रकरण आलं उघडकीस : 28 ऑक्टोबर 2023 रोजी करणला संजय गांधी रुग्णालयात दाखल केल्यानंतर व्यसनमुक्ती केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी करणच्या पत्नीला फोन केला. ते म्हणाले की, 'करणच्या पोटात दुखत आहे, त्यामुळं आम्ही त्यांला संजय गांधी रुग्णालयात दाखल केलंय. त्यांनंतर करणचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले आणि करणच्या पोटात मोठी जखम असल्याचं पाहून त्यांनी डॉक्टरांना विचारले. डॉक्टरांनी सांगितले की, करणचे आतडे फाटले आहेत. कोणीतरी धारदार वस्तूने त्याच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत केली आहे.

मारहाण करून टाकले गुप्तांगात लायटर : व्यसनमुक्ती केंद्रात आपल्यासोबत झालेल्या क्रूरतेची कहाणी स्वत: पीडित करणने सांगितली. तो म्हणाला की, व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक विवेंद्र अवस्थी, त्यांचा पुतण्या शिवकांत अवस्थी, कर्मचारी कैलाश तिवारी यांच्यासह अमित चतुर्वेदी यांनी माझ्यावर खूप अत्याचार केले. व्यसनमुक्ती केंद्रातील कर्मचारी अनेकदा बेदम मारहाण करत असभ्य भाषेत बोलत असल्याचं करणनं सांगितलं. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्याला एवढी मारहाण करण्यात आली होती की त्यांचे पाय सुजले. मात्र, ते तिथेच थांबले नाहीत. त्यानंतर त्यांनी पीडित करणच्या गुप्तांगात गॅस लायटर घातले.

कठोर कारवाई करू: संपूर्ण प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षक विवेक सिंह म्हणाले, 'पीडित तरुणाचे कुटुंबीय आमच्याकडे तक्रार करण्यासाठी आले होते, त्यांनी 2021 मध्ये करणला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. जेव्हा त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात घडलेला प्रकार कळाला तेव्हा त्यांनी व्यसनमुक्ती केंद्रावर काही गंभीर आरोप केले आहेत. तसंच वस्तुस्थिती समोर येताच त्याआधारे कठोर कारवाई केली जाईल.'

हेही वाचा -

  1. Thane Crime News: पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; पतीसह सासरच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल
  2. Molestation Case : धावत्या लोकलमध्ये विवाहितेचा विनयभंग; नराधमाला लोहमार्ग पोलिसांनी ठोकल्या बेड्या
  3. Thane Crime News: बायकोला गळफास देऊन ठार मारण्याचा प्रयत्न; नवरा फरार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.