नवी दिल्ली - सीआरपीएफच्या हेड कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पूर्व दिल्लीमध्ये मयूर विहार फेज 3 परिसरात स्मति वन पार्कमध्ये घडली आहे.
पोलिसांना माहिती मिळताच गाजीपूर ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जवानाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी सीआरपीएफ आणि मृताच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार शनिवारी सकाळी गाजीपूर ठाण्यांतर्गत स्मृतीवन येथे झाडाला मृतदेह लटकल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस हे घटनास्थळी पोहोचले. त्याठिकाणी बॅग आढळून आली. त्यामधील कागदपत्रानुसार मृतदेह हा 52 वर्षीय शाजी यांचा असल्याची माहिती समोर आली.
हेही वाचा-जेईई मेन्सच्या तिसऱ्या फेरीचा निकाल जाहीर; 17 विद्यार्थ्यांनी केली शंभरी पार
झारखंडमध्ये बदली झाल्याने जवानाची आत्महत्या?
शाजी हे सीआरपीएफमध्ये हेड कॉन्स्टेबल पदावर (ड्रायव्हर) कार्यरत होते. त्यांची दिल्लीमधील सीजीओ कॉम्पलेक्समध्ये पोस्टिंग होती. मृतदेहाजवळ आत्महत्येची चिठ्ठी आढळून आली नाही. त्यामुळे सीआरपीएफ जवानाने आत्महत्या केल्याची पुष्टी होऊ शकली नाही. 52 वर्षीय शाजी यांच्या मुलाने सांगितले, की 1 महिन्यापूर्वी त्यांची झारखंड येथे पोस्टिंग करण्यात आले. त्यामुळे ते निराशावस्थेत होते. दरम्यान, पोलीस घटनेची चौकशी करत आहेत.
हेही वाचा-दिल्लीच्या ईशान्य भागात तीन मजली इमारत कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती