लातेहार - झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात सीआरपीएफच्या एका जवानाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. स्वतःच्या रायफलनं गोळी मारून आत्महत्या केली आहे. प्रवीण मोचरी असे मृत जवानाचे नाव आहे. संबधित जवान आसामच्या बक्सा जिल्ह्यातील रहिवासी आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडल्याची माहिती आहे.
गोळीचा आवाज ऐकल्यानंतर सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा प्रवीण मोचरी यांचा मृतदेह रक्तांच्या थारोळ्यात पडला होता. सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. प्रवीण गेल्या काही दिवसांपूर्वी सुट्टीवरून परतले होते. तेव्हापासून ते तणावामध्ये होते. प्रवीण यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून सीआरपीएफचे अधिकारीही याप्रकरणी तपास करत आहेत
लातेहार प्रखंडमधील औरेया गावात 17 डिसेंबरला एका जवानाने स्वतःच्या रायफलनं गोळी मारून आत्महत्या केली होती. घटनेच्या 11 दिवसानंतर पुन्हा तशीच घटना घडली आहे.
हेही वाचा - एमआयएम नेत्याच्या गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचा अखेर मृत्यू