बंगळुरू - मगर पाहताच अनेकांची घाबरगुंडी उडते. पण, हीच मगर जर थेट घराजवळील रस्त्यावर आढळली तर...असा थरारक अनुभव उत्तर कन्नड जिल्ह्यातील कोगिलाबना गावातील नागरिकांनी घेतला.
थेट गावांमधील घरापासून मगर चालत असल्याने ग्रामस्थांची एकच धावपळ उडाली. तर काहीजणांनी ही मगर रस्त्यावरून चालत असल्याचा व्हिडिओ शूट केला. घाबरलेल्या ग्रामस्थांनी स्थानिक वनाधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली आहे. गावात शिरलेली मगर रस्त्यावरून चालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दंडेली गावाजवळ असलेल्या काली नदीमधन गावात मगर आल्याचा ग्रामस्थांचा अंदाज आहे.
हेही वाचा-RTE Admission : विद्यार्थी-पालकांना दिलासा; आरटीई प्रवेशासाठी आता 9 जुलैपर्यंत मुदतवाढ
केरळमधील मगरीचा व्हिडिओ झाला होता व्हायरल
केरळच्या अनंतपुरा येथील एका मंदिराच्या प्रवेशद्वारावर मगरीने ऑक्टोबर २०२० मध्ये भाविकांचे स्वागत केले होते. मंदिरालगत असलेल्या एका तलावात ही मगर आढळून आली. 'बबिया' असे या दुर्मीळ प्रजातीच्या मगरीचे नाव असल्याची माहिती समोर आली होती या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. केरळच्या कासरगोड जिल्ह्यातील कुंबाला येथे हे मंदिर आहे. मगरीचे वय ७५ वर्षे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मंदिरातील मुख्य पुजाऱ्याने मगरीचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता. या मगरीबद्दल परिसरात कुतुहूल आहे. मुख्य पुजारी आरतीनंतर प्रसादासाठी मगरीला आवाज देतात तेव्हा मगर पाण्यातून बाहेर येते. त्यामुळे लोकांमध्ये मगरीबद्दल आकर्षण आहे. मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांना आधीच याची कल्पना दिली जाते.
सांगलीत अज्ञात वाहनाच्या धडकेत मार्चमध्ये एक मगर ठार झाली होती. सांगली इस्लामपूर मार्गावरील लक्ष्मीफाटा याठिकाणी ही घटना घडली होती. महापुरानंतर या भागातील सखल भागात साचलेल्या पाण्यात या मगरीचे वास्तव्य असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा-सैन्यदलाकडून ड्रोन हल्ल्याविरोधात क्षमता विकसित करण्याचे काम सुरू - सी. एम. नरवणे