ETV Bharat / bharat

Cristiano Ronaldo : रोनाल्डोसाठी नवीन वर्षात आनंद; ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फुटबॉल क्लब अल नासरशी करार - अरेबियाच्या अल नासर या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार

पोर्तुगीज स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो ( Cristiano Ronaldo ) सौदी अरेबियाच्या अल नसर एफसी या क्लबमध्ये सामील झाला आहे. ( Cristiano Ronaldo Signed Saudi Arabia Club ) रोनाल्डोचा सौदीसोबतचा करार 200 मिलियन युरोपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. क्लबने पाच वेळा बॅलोन डी'ओर विजेत्या संघाची जर्सी हातात घेतलेले छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले. 37 वर्षीय रोनाल्डोने जून 2025 पर्यंत करार केला आहे. या करारानंतर रोनाल्डो म्हणाला की, मी वेगळ्या देशात नवीन फुटबॉल लीग खेळण्यास तयार आहे.

Cristiano Ronaldo
ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फुटबॉल क्लब
author img

By

Published : Dec 31, 2022, 1:22 PM IST

नवी दिल्ली : पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने ( Cristiano Ronaldo ) सौदी अरेबियाच्या अल नासर या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केला आहे. (Cristiano Ronaldo Signed Saudi Arabia Club ) क्रिस्टियानो हा व्यावसायिक फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. रोनाल्डोने यावर्षी जोसेफ बीकनला मागे टाकले होते. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही रोनाल्डोच्या नावावर आहे. रोनाल्डोने पोर्तुगालसाठी 196 सामन्यांत 118 गोल केले आहेत.

सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू : पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोनं सौदी अरेबियाच्या अल नासर या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केला आहे. यासह तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. युरोपमध्ये अनेक वर्षे खेळल्यानंतर तो आता आशियाई क्लबकडून खेळणार आहे. अल नासरनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ख्रिस्तियानो रोनाल्डोसोबत करार केल्याची माहिती दिली. हा एक असा करार आहे, जो केवळ आमच्या क्लबलाच नव्हे तर आमच्या देशाला, येणाऱ्या पिढ्यांना, मुले आणि मुलींना सर्वोत्तम बनण्यासाठी प्रेरित करेल.

  • History in the making. This is a signing that will not only inspire our club to achieve even greater success but inspire our league, our nation and future generations, boys and girls to be the best version of themselves. Welcome @Cristiano to your new home @AlNassrFC pic.twitter.com/oan7nu8NWC

    — AlNassr FC (@AlNassrFC_EN) December 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रोनाल्डोचा अल नासरसोबत विक्रमी करार : ख्रिस्तियानो रोनाल्डोने नवीन क्लबसोबत 2025 पर्यंत करार केला आहे. रोनाल्डोला वर्षाला 200 दक्षलक्ष युरो मिळतील म्हणजेच भारतीय चलनानुसार त्याला एका वर्षाला 17 अब्ज रुपये मिळतील, जे जगातील कोणत्याही खेळाडूचे सर्वात जास्त मानधन असेल. या अगोदर ख्रिस्तियानो रोनाल्डोने जुव्हेंटस सोडले आणि त्याचा माजी क्लब मँचेस्टर युनायटेडमध्ये सामील झाला होता. परंतु काही काळापूर्वी रोनाल्डोने वादानंतर हा क्लब सोडला.

रोनाल्डोची प्रतिक्रिया : सौदी अरेबियाच्या अल नासर फुटबॉल क्बलशी करार केल्यानंतर रोनाल्डो म्हणाला की, "मी वेगळ्या देशात नवीन फुटबॉल लीग खेळण्यासाठी उत्सुक आहे. अल नासेरच्या कार्यपद्धतीची दृष्टी खूप प्रेरणादायी आहे आणि मला माझ्या नवीन सहकाऱ्यांशी जुडताना आनंद होत आहे. एकत्रितपणे आपण संघाला मोठे यश मिळवून देऊ शकतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.