ETV Bharat / bharat

अजमेरच्या मित्तल रुग्णालयातील ऑक्सिजन संपण्याच्या स्थितीत; ९० रुग्णांचा जीव धोक्यात

रुग्णालय प्रशासनाने हात वर केल्यामुळे नातेवाईकांचाही धीर खचला आहे. या सर्व नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाला लवकरात लवकर ऑक्सिजन देण्याची मागणी केली आहे. या नातेवाईकांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

author img

By

Published : May 4, 2021, 10:35 AM IST

Crisis on the lives of 90 patients suffering from corona
अजमेरच्या मित्तल रुग्णालयातील ऑक्सिजन संपला; ९० रुग्णांचा जीव धोक्यात

जयपूर : राजस्थानच्या अजमेरमध्ये असणाऱ्या मित्तल रुग्णालयातील ऑक्सिजन संपत आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयातील तब्बल ९० रुग्णांच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज सकाळीपर्यंतचाच ऑक्सिजन शिल्लक असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे प्रशासनाने रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना दुसरीकडे नेण्याची विनंती केली आहे.

अजमेरच्या मित्तल रुग्णालयातील ऑक्सिजन संपला; ९० रुग्णांचा जीव धोक्यात (व्हायरल व्हिडिओ)

रुग्णालयाचा कथित मेसेज सोशल मीडियावर व्हायरल..

अजमेरमध्ये सध्या जवळपास सर्वच सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजन बेड भरलेले आहेत. अशात मित्तल रुग्णालयाला सकाळीपर्यंत ऑक्सिजन मिळाला नाही, तर या सर्व रुग्णांनी कुठे जायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रुग्णालय प्रशासनाने हात वर केल्यामुळे नातेवाईकांचाही धीर खचला आहे. या सर्व नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाला लवकरात लवकर ऑक्सिजन देण्याची मागणी केली आहे. या नातेवाईकांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यासोबतच रुग्णालय प्रशासनाने हतबलपणे केलेला एक व्हॉट्सअप मेसेजही सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.

Crisis on the lives of 90 patients suffering from corona
रुग्णालयाचा कथित मेसेज सोशल मीडियावर व्हायरल..

रुग्णालयाकडून अधिकृत माहिती नाही..

दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने मात्र यासंदर्भात अधिकृत माहिती दिली नाही. मात्र, रात्रीच्या सुमारास कित्येक रुग्णांचे नातेवाईक ऑक्सिजनची मागणी करताना दिसून आले होते. जिल्हाधिकारी प्रकाश राजपुरोहित यांनी लवकरच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करु असे आश्वासन दिल्याचेही सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : ओडिशा : कोरोना रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी मंत्र्याने स्वतः चालवली अ‌ॅम्बुलन्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.