ETV Bharat / bharat

Crime News : पतीच ठरला वैरी! फक्त पाच हजार रुपयांसाठी केला पत्नीच्या अब्रुचा सौदा - हजार रुपयांसाठी केला पत्नीच्या अब्रुचा सौदा

Crime News : पिलीभीत मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फक्त 5 हजार रुपयांसाठी एका व्यक्तीनं दोन तरुणांसोबत आपल्या पत्नीच्या अब्रुचा सौदा केलाय. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी पतीसह तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

crime news In Pilibhit
पाच हजार रुपयांसाठी पतीने केला पत्नीच्या अब्रुचा सौदा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 11:55 AM IST

पीलीभीत Crime News : जिल्ह्यात केवळ पाच हजार रुपयांत एका पतीनं आपल्या पत्नीच्या अब्रुचा सौदा केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर पतीनं तिला दोन जणांच्या ताब्यात देत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसंच तिच्यावर वेश्याव्यवसाय करण्यासाठी दबाव टाकला. पीडित महिलेनं यासाठी नकार दिल्यानंतर आरोपीनं तिला तिहेरी तलाकची धमकी दिली. यामुळं त्रस्त महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार केली असता, आरोपीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

2018 मध्ये झाला विवाह : सुनगढी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ग्रामीण महिलेच्या तक्रारीवरून पोलीस अधीक्षकांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत पीडितेनं म्हंटलंय की, 2018 मध्ये तिचा विवाह जहानाबाद पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या तरुणाशी झाला होता. महिलेचा पती ट्रक चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. लग्नानंतर पतीने अनैसर्गिक संबंध ठेवून महिलेचा छळ सुरू केल्याचा आरोप आहे.

तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल : पीडित महिलेनं आरोप केलाय की, तिचा पती तिच्यावर वेश्याव्यवसायातून रोज 5000 रुपये कमवण्यासाठी दबाव आणत होता. 8 ऑगस्टच्या रात्री आरोपी पती दोन तरुणांसह घरी आला आणि दोघांकडून अडीच हजार रुपये घेऊन तिला त्यांच्याकडं सुपूर्द केल्याचा आरोप आहे. यानंतर दोन्ही तरुणांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. इतकंच नाही तर आरोपी पतीनं महिलेला मारहाण केली आणि वेश्याव्यवसाय केल्यास तिहेरी तलाक देण्याची धमकी दिली. त्यामुळं त्रासलेल्या महिलेनं पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. दरम्यान, एसपींच्या आदेशानुसार सुनगढ़ी पोलीस ठाण्यात पतीसह तीन जणांविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्याचे प्रमुख संजीव शुक्ला यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगितलं.

हेही वाचा -

  1. Six People Murdered in Deoria : उत्तर प्रदेश हादरलं! जुन्या वादातून माजी जिल्हा परिषद सदस्यासह 6 जणांची हत्या
  2. UP Crime News : धक्कादायक! युट्यूबवरून शिकून छापल्या बनावट नोटा, दोघांना रंगेहाथ पकडले
  3. UP Crime News : पतीने परदेशात न नेल्याचा राग; पत्नीची तीन चिमुकल्यांसह आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.