रुड़की ( उत्तराखंड ) : डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ऋषभ पंतच्या कपाळाला आणि पायाला दुखापत झाली आहे. माहिती मिळताच देहात पोलीस अधीक्षक स्वप्ना किशोर सिंह ( Superintendent of Police Swapna Kishore Singh ) घटनास्थळी पोहोचल्या. सक्षम हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुशील नागर यांनी सांगितले की, सध्या ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे, त्यांना रुरकीहून दिल्लीला पाठवण्यात येत आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी ( Rishabh Pants plastic surgery ) केली जाणार आहे.
-
रुड़की लौटते समय रेलिंग से टकराई कार, हादसे के बाद लगी भीषण आग, अस्पताल में भर्ती ऋषभ पंत @NavbharatTimes #Rishabpant pic.twitter.com/QOvjv39vwl
— NBT Uttar Pradesh (@UPNBT) December 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">रुड़की लौटते समय रेलिंग से टकराई कार, हादसे के बाद लगी भीषण आग, अस्पताल में भर्ती ऋषभ पंत @NavbharatTimes #Rishabpant pic.twitter.com/QOvjv39vwl
— NBT Uttar Pradesh (@UPNBT) December 30, 2022रुड़की लौटते समय रेलिंग से टकराई कार, हादसे के बाद लगी भीषण आग, अस्पताल में भर्ती ऋषभ पंत @NavbharatTimes #Rishabpant pic.twitter.com/QOvjv39vwl
— NBT Uttar Pradesh (@UPNBT) December 30, 2022
कार रेलिंगला आदळल्याने झाला अपघात : ऋषभची कार रेलिंगला धडकली, त्यानंतर कारने पेट घेतला. मोठ्या कष्टाने आग आटोक्यात आणण्यात आली. त्याचवेळी अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतला दिल्ली रोडवर असलेल्या सक्षम रुग्णालयात दाखल ( Sakham Hospital Delhi ) करण्यात आले.
ऋषभ दिल्लीहून रुरकीच्या दिशेने येत होता : शुक्रवारी सकाळी भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत दिल्लीहून रुरकीच्या दिशेने कारमधून येत होता. ऋषभ पंतचे घर रुरकी येथे आहे. त्यांची कार नरसन शहराजवळ आल्यावर कार अनियंत्रित होऊन रेलिंग व खांब तोडून पलटी झाली.
ऋषभ सक्षम रुग्णालयात दाखल : यानंतर त्याच्या कारला आग लागली. तोपर्यंत गावकरी आणि पोलीसही घटनास्थळी पोहोचले. याची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. घाईगडबडीत क्रिकेटपटू ऋषभ पंतला दिल्ली रोडवरील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथून त्यांना दिल्लीला रेफर करण्यात आले आहे.